शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

आजरा कारखाना राष्ट्रवादीच्या संचालकांनी कामगारांना हाताशी धरून बंद पाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST

आजरा : आजरा साखर कारखाना चांगला चालू होता; पण विरोधी राष्ट्रवादीच्या संचालकांनी मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले. हसन मुश्रीफ ...

आजरा : आजरा साखर कारखाना चांगला चालू होता; पण विरोधी राष्ट्रवादीच्या संचालकांनी मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले. हसन मुश्रीफ यांना सांगून कारखाना बंद पाडण्याचा तगादा लावला होता. तरीही कारखाना सुस्थितीत सुरू होता. मग कामगारांना हाताशी धरून कारखाना बंद पाडण्यात आला, असा आरोप आजरा कारखान्याचे माजी अध्यक्ष अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख व जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी यांनी केला. ते आजरा सूतगिरणीच्या कार्यस्थळावर गोकुळ निवडणुकीबाबत आयोजित बैठकीत बोलत होते.

तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच विकासाला महत्त्व दिले. विरोधकांच्या षड्‌यंत्रानंतर कारखान्याचे अध्यक्षपद सोडले. त्यावेळी ३९ कोटी असणारे कर्ज ६५ कोटींवर गेले. यामध्ये तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची काय चूक, असा सवालही चराटी यांनी केला. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत गेल्या वेळी तालुक्यातून १६० मतांची व्यवस्था करून दिल्यानंतर सत्तारूढ पॅनल निवडून आले; पण गेल्या पाच वर्षांत महादेव महाडिक किंवा आमदार पी. एन. पाटील यांनी आम्हाला विचारात घेतले नाही. कारखान्याला कर्ज देताना जिल्ह्यातील नेत्यांनी राजकारण केले. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत गेल्या वेळेप्रमाणे यावेळीही ताकद दाखविणार आहे, असेही अशोक चराटी यांनी सांगितले.

मेळाव्यास विलास नाईक, विजयकुमार पाटील, के. व्ही. येसणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रमेश रेडेकर, दिगंबर देसाई, सुरेश डांग, डॉ. अनिल देशपांडे, दशरथ अमृते, राजू पोतनीस, निवृत्ती शेंडे यासह कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. इंद्रजित देसाई यांनी आभार मानले.

- आजरा कारखान्याबाबत हात आखडता का ?

जिल्ह्यातील आर्थिक अडचणीत असणाऱ्या साखर कारखान्यांना जिल्हा बँक अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी मदत केली; पण आजरा कारखान्याला उभारी देण्यासाठी हात आखडता का घेतला, असा सवालही अशोक चराटी यांनी केला.

-------

गोकुळ दूध संघ निवडणुकीसाठी आपल्याकडे ४० ठरावधारक आहेत; पण स्वाभिमान गहाण ठेवून कोणताही निर्णय घेणार नाही, असे अशोक चराटी यांनी सांगून महादेव महाडिक, आमदार पी. एन. पाटील यांच्यावर थेट आरोप केले.

-------------------

* कारखाना सुरू करण्याच्या अभिवचनाचे काय ?

कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी आपले मेडिकल कॉलेज बंद पडले तरी चालेल; पण कारखाना सुरू करणार असे अभिवचन दिले होते. त्याचे काय झाले, असाही सवाल अशोक चराटी यांनी केला.