शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Death in Plane Crash: मंत्री मुश्रीफांना अश्रु अनावर; शाहू छत्रपती म्हणाले, सगळ्यांसाठी झटणारा महाराष्ट्राचा नेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 13:24 IST

अजित पवारांच्या निधनांची माहिती मिळताच मंत्री हसन मुश्रीफ यांना अश्रु अनावर

कोल्हापूर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. यात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. यादुर्घटनेनंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. अजित पवारांच्या निधनांची माहिती मिळताच मंत्री हसन मुश्रीफ यांना अश्रु अनावर झाले. तर कोल्हापुरातील नेत्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.खासदार शाहू छत्रपती म्हणाले, अजित पवारांचे आणि आमचे जवळजवळ ३० वर्षांचे संबंध होते. एक बहुजन समाजाचे महत्वाचे नेतृत्व म्हणून ते पुढे आले होते. गेल्या काही वर्षांत जरी त्यांचे आणि शरद पवारांचे काही मतभेद होते, मात्र ते वैचारिक मतभेद होते. खऱ्या अर्थाने ते सगळे एकच आहेत. सगळ्यांसाठी झटणारा एक महाराष्ट्राचा महत्त्वाचा नेता होता. अर्थव्यवस्थेचा त्यांनी चांगला अभ्यास केला होता. अशी व्यक्ती गेल्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. ते रोखठोक नेते होतेच, कुठलीही गोष्ट ते स्पष्टपणे बोलायचे. एके दिवशी त्यांचा मला त्यांचा भेटायला येणार असल्याचा रात्री फोन आला होता. अन् सकाळी ९ वाजता ते येणार होते मात्र सव्वा आठलाच ते आले होते.

एक कर्तृत्ववान नेतृत्व राज्य मुकले - सतेज पाटीलकाँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी दिवस असल्याचे सांगत अजित दादांच्या बद्दल भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सुचत नाही आहेत. एक कर्तृत्ववान नेतृत्व राज्य मुकले आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

वाचा- अजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्रात ३ दिवसाचा दुखवटा, आज शासकीय सुट्टी जाहीर; CM देवेंद्र फडणवीस गहिवरलेमहाराष्ट्र पोरका झाला - धनंजय महाडिकखासदार धनंजय महाडिक म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी टीव्हीवर पाहिली. यानंतर देवाकडे प्रार्थना करतो होतो यानंतर दुसरी काही बातमी येवू नये. पण विमानाची दृश्य दाखवली त्यावेळी छातीतील धडधड वाढली अन् काही क्षणात जी बातमी एेकायला नको होती ती समोर आली. अजितदादा निघून गेल्याने महाराष्ट्र पोरका झाला. अतिशय स्पष्ट वक्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. कार्यकर्त्यांवर जिवापार प्रेम करणारे असे दादा स्वप्नात देखील वाटले नव्हेत. महाराष्ट्रात मोठी पोकळीक झाली असून ती कधीही भरुन निघणारी नसल्याच्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.उमेदा नेता गमावला - राजू शेट्टीउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत विमान अपघातात निधन झाल्याचे एेकले अन् मन सुनं झाल्याची प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, महाराष्ट्राने उमेदा स्वभावाचा, दिलदार, मोकळा ढाकळ्या स्वभावाचा नेता गमावला. राजकारण, समाजकारण, सहकार अन् राज्याच्या आर्थिकस्थितीची खडानंखडा माहिती असणारा एक अभ्यासू असे नेतृत्व महाराष्ट्राने गमावले. गेल्या दोन दशकामध्ये राज्याच्या राजकारणात अजितदादांचा प्रभाव होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेकदा टीकाटिपण्णी होवून सुद्दा व्यक्तिगत स्नेह कायम होता. दिलदार मनाच्या अजितदादाच्या जाण्याने महाराष्ट्र हादरला असल्याचे मत व्यक्त करत शेट्टींनी अजितदादांना श्रद्धांजली वाहिली.

वाचा- अजित पवारांचे विमान उडवणाऱ्या कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांना किती अनुभव होता?​​​​​​​हा अतिशय मोठा धक्का - संजय मंडलिकमाजी खासदार संजय मंडलिक म्हणाले, हा अतिशय मोठा धक्का मला आणि महाराष्ट्रातल्या सर्व तरुण राजकारणी मंडळींना आहे. अनेकजण त्यांचा आदर्श घेऊन अनेक मंडळी राजकारणात काम करत आहेत. विशेषतः कोल्हापूरशी देखील त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. अनेकवेळा भेटल्यानंतर ते कोल्हापूरच्या आठवणी सांगायचे. अशा नेत्याला राज्याने गमावल्यामुळे सर्वच पक्षातील नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. हे कधीही न भरून निघणार नुकसान असल्याचे मत व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar Dies in Plane Crash; Leaders Express Grief

Web Summary : Deputy Chief Minister Ajit Pawar tragically died in a plane crash near Baramati. Leaders across Maharashtra expressed deep sorrow, remembering Pawar's contributions and impact on the state's development and welfare.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDeathमृत्यूPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकRaju Shettyराजू शेट्टीsanjay mandlikसंजय मंडलिक