शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिगामी शक्तींविरोधात कोल्हापुरातून ठिणगी पेटवू

By admin | Updated: August 30, 2015 23:44 IST

कोल्हापुरात निदर्शने : माजी कुलगुरूडॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सभा

कोल्हापूर : धारवाड (कर्नाटक) येथे माजी कुलगुरू डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची रविवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ रविवारी सायंकाळी बिंदू चौक येथे पुरोगामी धर्मनिरपेक्ष संघटनेच्यावतीने निषेध सभा घेण्यात आली. यावेळी विविध वक्त्यांनी निषेध व्यक्त करताना प्रतिगामी शक्तीविरोधात कोल्हापुरातून मोठा लढा उभा करावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. यावेळी ‘डॉ. कलबुर्गी अमर रहे’, ‘अभिव्यक्ती के खतरे उठाने होंगे’, अशा घोषणा दिल्या. निषेध सभेत बोलताना प्रा. उदय नारकर म्हणाले, गेल्या दोन वर्षांत पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकात पुरोगामी विचारांची प्रेरणा देणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे आणि आता डॉ. कलबुर्गी यांची हत्या प्रतिगामी शक्तींनी घडवून आणली आहे. त्यामुळे आता केवळ मेणबत्ती पेटवून प्रतीकात्मक निषेध नोंदवून चालणार नाही. याकरिता सप्टेंबर महिन्यापासूनच या धर्मांध शक्तींविरोधात लढा दिला पाहिजे. यावेळी प्रा. मेघा पानसरे यांनी निषेध व्यक्त करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सुरू आहे. आता अटीतटीचा लढा उभा करणे गरजेचे बनले असल्याचे मत मांडले. यावेळी भाकपचे चंद्रकांत यादव, जीवन बोडके, दिलीप पवार, गिरीष फोंडे यांनी निषेध व्यक्त केला. येत्या ६ सप्टेंबरला याच्या निषेधार्थ लाल निशाण पक्ष येथे डॉ. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती शंकर काटाळे यांनी दिली. यावेळी शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य अनिल घाटगे, अ‍ॅड. अरुण सोनाळकर, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, बाबा यादव, दिलीप पवार, नामदेव गावडे, कपिल मुळे, दिलावर मुजावर, सुशील लाड, विकास दाबाडे, राहुल जोखे, प्रशांत पिसे, अमोल देवडकर, अनिल चव्हाण, सुनीता अमृतसागर, प्रमोद म्हेत्रे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘रिंगण’ नाटकाला कागलमध्ये विरोध‘रिंगण’ या नाटकाचे राज्यभरात ३५० प्रयोग झाले आहेत. रविवारी कागल येथे या नाटकाचे प्रयोग करण्यासाठी ‘अंनिस’चे कार्यकर्ते गेले असता येथे जमाव बंदीच्या कारणावरून प्रयोग करू दिले नाहीत, अशी माहिती यादरम्यान मेघा पानसरे यांनी दिली. त्यांनी त्याचा निषेध केला.