शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायत निवडणुकींचा धुरळा उडणार, प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 18:06 IST

जूनच्या पहिल्या आठवड्यात मतदान शक्य

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा धुरळा बसतो न बसतो तोच जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२६ पर्यंत मुदत संपणाऱ्या ४३३ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शुक्रवारपासून प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू केली जाणार असून ३० मार्च प्रारूप तर २८ एप्रिलला अंतिम रचना केली जाणार आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची दाट शक्यता आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

ग्रामपंचायतींची मुदत संपण्यापूर्वी सहा महिने प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू केली जाते. पण, डिसेंबर, जानेवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची प्रक्रिया अद्याप सुरू केलेली नव्हती. त्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकामुळे ही प्रक्रिया आता सुरू केली आहे.

मंगळवारपासून गावांचे नकाशे तयार करून तलाठी व ग्रामसेवक यांनी स्थळ पाहणी करून सीमा निश्चित करणे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवणे. प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती त्यावर सुनावणी होऊन ४ मे रोजी अंतिम रचना केली जाणार आहे. त्यानंतर, प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करुन साधारणता मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे.

ग्रामपंचायतींवर मंगळवारी प्रशासक येणार

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमुळे डिसेंबर, जानेवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका लांबणीवर पडल्या. या ग्रामपंचायतींचा कार्यक्रम मंगळवारी (दि. २४) संपत असल्याने त्याच दिवशी प्रशासक नियुक्ती केली जाणार आहे. तालुक्याचे विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.

प्रभाग रचनेवर ठरणार विजयाचे गणित

प्रभाग रचनेवर निम्मा निकाल अवलंबून असतो. त्यामुळे आपल्या सोयीचे घरे, गल्ली आपल्या प्रभागात घेण्यासाठी इच्छुकांची व्यूहरचना असते. त्यामुळे भाैगोलिक संलग्नता राखत प्रभाग रचना करताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. प्रभागाच्या रचनेवरच विजयाचे गणित अवलंबून असल्याने रचनेवर हरकती मोठ्या प्रमाणात येतात.

असा राहणार प्रभाग रचनेचा कार्यक्रम...
प्रभाग रचना प्रक्रिया - तारीख
गुगल नकाशे तयार करणे :  २० फेब्रुवारी
सीमा निश्चित करणे : २७ फेब्रुवारी
प्रारूप रचनेची तपासणी :   ५ मार्च
प्रारूप रचना उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठवणे : ११ मार्च
जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवणे : १७ मार्च
प्रारूप रचना प्रसिद्ध : ३० मार्च
हरकती घेऊन अंतिम रचना जाहीर करणे :  ४ मे             
           
तालुकानिहाय निवडणुकीस पात्र ग्रामपंचायती...
कागल : ५६
करवीर : ५३
भुदरगड : ४६
गडहिंग्लज : ४३
पन्हाळा : ४३
शाहूवाडी : ४२
शिरोळ : ३४
आजरा : २६
हातकणंगले : २२
राधानगरी : १९
गगनबावडा : ०९

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Gears Up for 433 Gram Panchayat Elections After ZP Polls

Web Summary : Kolhapur prepares for 433 Gram Panchayat elections. The ward formation process starts Friday, with finalization by April 28. Voting is likely in early June. Administrators will be appointed to Gram Panchayats on Tuesday as terms expire.