शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

दिलगिरीनंतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे

By admin | Updated: June 12, 2015 00:54 IST

परीक्षा नियंत्रकांकडून अपशब्द प्रकरण : प्रभारी कुलगुरूंचा पुढाकार

कोल्हापूर : परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने शिवाजी विद्यापीठ सेवक संघाने गुरुवारी पुकारलेले आंदोलन मागे घेतले. याबाबत प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी परीक्षा नियंत्रक काकडे व सेवक संघाच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. संगणक केंद्राच्या प्रभारी संचालिका स्वाती खराडे यांना अर्वाच्च भाषा वापरल्याप्रकरणी परीक्षा नियंत्रक काकडे यांचा कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि. १०) द्वारसभा घेऊन निषेध केला. परीक्षा नियंत्रकांनी माफी मागेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार सेवक संघाने केला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार होते. तत्पूर्वी प्रभारी कुलगुरू डॉ. भोईटे यांनी सेवक संघाच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलाविले. त्यावर ठिय्या आंदोलन स्थगित करून शिष्टमंडळ सकाळी सव्वाअकरा वाजता कुलगुरूंच्या कक्षात गेले. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी परीक्षा नियंत्रक आणि ग्रंथपाल यांचे वर्तन आणि त्यांच्या बोलण्याबाबतच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी डॉ. भोईटे यांना सांगितल्या. शिवाय संगणक केंद्राच्या प्रभारी संचालिका खराडे यांच्याबाबत घडलेल्या प्रकाराबाबत परीक्षा नियंत्रकांनी माफी मागावी, अशी मागणी केली. शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर डॉ. भोईटे यांनी परीक्षा नियंत्रक काकडे यांना बोलावून घेऊन त्यांच्याशीदेखील चर्चा केली. शिवाय, कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांबाबत काही तक्रारी असल्यास संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांच्याशी पहिल्यांदा चर्चा करावी. शिवाय, अधिकाऱ्यांनीदेखील कर्मचाऱ्यांबाबत तक्रार असल्यास प्रशासन आणि संघाच्या अध्यक्षांशी चर्चा करावी, अशी सूचना डॉ. भोईटे यांनी दिली. त्यानंतर परीक्षा नियंत्रक काकडे यांनी बुधवारी घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. दिलगिरी व्यक्त केल्यामुळे सेवक संघ आंदोलन मागे घेत असल्याचे अध्यक्ष सावंत यांनी यावेळी सांगितले. बैठकीस कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. आर. बी. पाटील उपस्थित होते. संघाच्या शिष्टमंडळात चिटणीस किशोर सासने, अतुल ऐतावडेकर, खजानीस सुरेश पाटील, संभाजीराव जगदाळे, मिलिंद भोसले, आदींचा समावेश होता. दरम्यान, बैठकीनंतर सेवक संघाने द्वारसभा घेऊन प्रभारी कुलगुरूंसमवेत झालेल्या चर्चेची माहिती कर्मचाऱ्यांना दिली.