शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत आजपासून पास पाहूनच प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST

(बाजार समिती लोगो) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (सोमवार)पासून ...

(बाजार समिती लोगो)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (सोमवार)पासून समितीने दिलेला पास पाहूनच प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर अडते, व्यापाऱ्यांसह हमाल, तोलाईदारांचीही ॲन्टिजन चाचणी केली जाणार आहे.

राज्यात लॉकडाऊन असले तरी भाजीपाल्यासह अत्यावश्यक सेवा सुरूच आहे. भाजीपाला, फळांसह इतर खरेदी-विक्री सुरू आहे. कोल्हापूर बाजार समितीत रोज परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतीमाल येतो. त्याच्या खरेदीसाठी व्यापाऱ्यांची गर्दी होते. त्यात इतर व्यवसाय बंद असल्याने भाजीपाला विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात सौद्यावेळी गर्दी हाेत आहे. यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. समिती प्रशासनाने सौद्यावेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन यापूर्वीच खबरदारी घेतली आहे. सॅनिटायझर, सुरक्षित अंतर ठेवण्याबाबतची जनजागृती, आदी बाबी केल्या आहेत. तरीही गर्दी आटोक्यात येत नाही. यासाठी समितीने खरेदीदार व व्यापाऱ्यांना भाजीपाला, फळे खरेदीसाठी येताना प्रवेश पास दिला आहे. तो पाहूनच त्यांना आत सोडले जाणार आहे. हा पास नसणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही.

महापालिका, बाजार समिती व पोलीस प्रशासनातर्फे भाजीपाला मार्केटमधील व्यापारी, अडते, खरेदीदार, हमाल व तोलाईदारांची ॲन्टिजन चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी दिली.

‘आरटीपीसीआर’ चाचणीत अनेकजण पॉझिटिव्ह

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी समिती आवारात येणाऱ्यांची दोन दिवसांपूर्वी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये अनेकजण पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली होती.