शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जलपर्णी हटविण्यात प्रशासन नापास

By admin | Updated: June 24, 2015 00:56 IST

समस्या बिकट : नदीला पूर आल्यानंतरच जलपर्णी वाहून जाणार

कुरुंदवाड : पंचगंगा नदीत पाणी प्रदूषणाबरोबरच जलपर्णीचीही समस्या गंभीर आहे. जलपर्णी हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून फारसे प्रयत्नही केले जात नाहीत. त्यामुळे ही समस्या बिकट होत असून, पुराच्या काळात जलपर्णी वाहून गेल्यावरच नदीला मुक्ती मिळते. त्यामुळे जलपर्णी वाहून जाण्यासाठी पंचगंगा नदीकाठावरील नागरिक पुराच्या प्रतीक्षेत आहेत.पंचगंगा नदी प्रदूषणाचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला सोसावा लागत आहे. मात्र, या नदी प्रदूषणाबरोबर जलपर्णीची समस्याही तितकीच गंभीर आहे. पंचगंगा नदीवर तेरवाड व शिरोळ हे शेवटचे बंधारे आहेत. जलपर्णी या बंधाऱ्याला तटल्याने संपूर्ण नदीपात्र जलपर्णीने व्यापते. ऐन उन्हाळ्यातच ही समस्या निर्माण होते. जलपर्णीची समस्या गंभीर बनल्यानंतरच जिल्हा प्रशासन ते हटविण्यासंदर्भात नियोजन करते. मात्र, चार ते पाच फूट उंचीचा थर निर्माण होत असल्याने जलपर्णी पूर्ण हटविणे जिकिरीचे बनते. अखेर महापुरातूनच जलपर्णी वाहून जाते. निसर्गाने निर्माण केलेले संकट निसर्गच मुक्त करतो. त्यामुळे जलपर्णी वाहून जाण्यासाठी पंचगंगा नदीकाठचे नागरिक व शेतकरी पुराच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे पंचगंगा तुडुंब भरून वाहत आहे. नदीवरील पूल, बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्यानंतरच जलपर्णी वाहून जाते. पाण्यामुळे जलपर्णी पात्रातून वर येत असून, लवकरच पंचगंगा नदी जलपर्णीमुक्तहोण्याची शक्यता आहे. जलपर्णीमुळे आॅक्सिजनचे प्रमाण घटतेहवेतील आॅक्सिजन पाण्यात विरघळल्यावरच जलचरांना श्वास घेणे शक्य आहे. मात्र, नदीपात्र जलपर्णीने व्यापल्याने, तसेच प्रदषणामुळे पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन मासे मृत पावण्याच्या घटना घडत असतात.