शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्ती कागदावरच

By admin | Updated: November 20, 2015 00:17 IST

समाजकल्याण विभागाचे दुर्लक्ष : अंमलबजावणीसाठी समित्याच नाहीत

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यसनमुक्ती योजनेचे काम कागदावरच राबविले जात आहेत. शासन निर्णय असूनही समाजकल्याण विभागाकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या समित्याच स्थापन करण्यात आलेल्या नाहीत. या समित्या स्थापन करण्याबाबत हा विभाग अद्यापही अनभिज्ञ असल्याने व्यसनमुक्ती योजना जिल्ह्यात कागदावरच राबविली जात आहे.सामाजिक न्याय विभागामार्फत सन २०११ मध्ये शासन निर्णय होऊन व्यसनमुक्ती योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समित्या स्थापन करून या समित्यांमार्फत जिल्ह्यात व्यसनमुक्तीचे काम प्रभावीपणे व्हावे. जिल्ह्यातील जनतेमध्ये व्यसनमुक्तीबाबत प्रचार प्रसिद्धी व्हावी, व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनापासून परावृत्त करण्याचे योगदान सर्व स्तरातून प्रभावीपणे व्हावे हा उद्देश ठेवून शासनाने या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक तालुकास्तरीय समित्यांचे गठण करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या शासन निर्णयापासून अद्यापही समाजकल्याण विभाग अनभिज्ञच आहे. (प्रतिनिधी)शासन निर्णयाचे पालन नाहीव्यसनमुक्ती योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन गावागावातून उठाव झाला पाहिजे. जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी तसेच या धंद्यांमुळे व्यसनाधीन झालेल्या तरुणांना व्यसनापासून दूर करण्याची महत्त्वाची कामगिरी होणे गरजेचे आहे. पण या योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा परिषद समाजकल्याण विभागच अनभिज्ञ असल्याने आणि शासन निर्णयाचे काटेकोर पालन या जिल्ह्यात केले जात नसल्याने या जिल्ह्यात व्यसनमुक्ती ही शासनाची महत्त्वपूर्ण योजना लोप पावल्याचे चित्र आहे.