पन्हाळा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून कोडोलीकडे पाहिले जाते. कोडोलीसह तालुक्यातील अनेक गावात आमदार विनय कोरे व माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील गट एकत्रित येऊन निवडणूक लढविली. कोडोली ग्रामपंचायत निवडणूक आमदार विनय कोरे, माजी शिक्षण सभापती अमरसिंह पाटील, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. जयंत पाटील यांच्या आघाडीने १५ जागांवर मुसंडी मारत सत्ता मिळविली. पन्हाळा तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीवर जनसुराज्यशक्ती पक्षाने दावा केला आहे. पन्हाळ्यासह शाहूवाडी, हातकणंगले आदी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे नूतन सदस्य व कार्यकर्त्यांनी आज दुसऱ्या दिवशीही रीघ लावत आमदार कोरे यांची भेट घेऊन सत्कार केला. रात्री उशिरापर्यंत वारणेतील संपर्क कार्यालयात आमदार कोरे यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
फोटो.. वारणानगर येथे
जनसुराज्यशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांच्या सत्कारासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली आहे...