पार्किंग नसणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:26 IST2021-08-27T04:26:52+5:302021-08-27T04:26:52+5:30

कोल्हापूर : पार्किंगसाठी राखीव जागा न ठेवणाऱ्या शहरातील हॉस्पिटलवर कारवाई करावी, अशी मागणी गुरुवारी ई वॉर्ड लोककल्याण संघर्ष समितीने ...

Action should be taken against hospitals without parking | पार्किंग नसणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करावी

पार्किंग नसणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करावी

कोल्हापूर : पार्किंगसाठी राखीव जागा न ठेवणाऱ्या शहरातील हॉस्पिटलवर कारवाई करावी, अशी मागणी गुरुवारी ई वॉर्ड लोककल्याण संघर्ष समितीने राजारामपुरीतील महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांकडे केली.

समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी नगररचना सहायक संचालक आर.सी महाजन यांची भेट घेऊन शहरातील काही हॉस्पिटलांनी पार्किंग गायब केल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. राजारामपुरी परिसरात ९५ हॉस्पिटल असताना केवळ सात हॉस्पिटलांना नोटीस दिली होती. तीही कारवाई झाली नाही म्हणून कार्यकर्त्यांनी महाजन यांना धारेवर धरले.

शंभर बेडच्या हॉस्पिटलमध्ये पार्किंग नसल्यास कारवाई करा, अशी मागणी अनिल घाडगे यांनी तर ज्या विभागात अतिक्रमण झाले तेथील अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी अनिल कदम यांनी केली. महापालिकेत प्रशासक राज असल्याने कोणाचा दबाव न घेता कारवाई करावी, अशी मागणी दिलीप देसाई यांनी केली. महापालिकेतील एका अधिकाऱ्यांच्या हॉस्पिटलमध्येही पार्किंग नसल्याचे सांगत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी बाबा इंदूलकर यांनी केली.

शहरातील चौदा हॉस्पिटलांना नोटीस बजावण्यात आल्या असून लवकरच संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे महाजन यांनी सांगितले. यावेळी महादेव पाटील, अमर निंबाळकर, किशोर माने, महादेव केसरकर, ऋतुराज माने उपस्थित होते.

Web Title: Action should be taken against hospitals without parking