शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळ्याचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ कागदावरच

By admin | Updated: December 17, 2014 23:02 IST

ठोस उपायांची गरज : कागदी घोडे नाचविण्यातच प्रशासन आघाडीवर

कोल्हापूर : ढासळणाऱ्या संरक्षण भिंती, खराब रस्त्यांमुळे पसरलेले धुळीचे साम्राज्य, नावालाच असलेले बगीचे, कागदावरचीच नौकाविहार, दररोज मिसळणाऱ्या मैलामिश्रित सांडपाण्यामुळे काळे-निळे होत असलेले पाणी, आदी समस्यांनी ऐतिहासिक रंकाळ्याला घेरले आहे. रंकाळ्यासाठी १०० कोटींचा निधी द्या, अशी मागणी शासनाकडे करून प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे रंकाळ्याचा कागदावरचा अ‍ॅक्शन प्लॅन सत्यात उतरवून रंकाळ्याची दुरवस्था रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.रंकाळा तलाव संवर्धनाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी महापालिकेची खास महासभाही झाली. तीनवेळा ‘एक दिवस रंकाळा’ हा उपक्रमही राबविला गेला. मात्र, रंकाळा प्रदूषणप्रश्नी महानगरपालिका प्रशासन ढिम्मच आहे. संरक्षक कठड्याची पडझड व सांडपाण्यामुळे रंकाळ्याला अवकळा आली आहे. रंकाळ्याची संरक्षक भिंत दोन ठिकाणी पडली आहे. वर्षभरापासून त्याच्या दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे. यानंतर पडलेल्या भगदाडाची दुरुस्ती करण्याची तसदीही महापालिकेने घेतलेली नाही. शाम हौसिंग सोसायटीकडून थेट तलावात मिसळणारा नाला वळविण्यासाठी दुधाळीपर्यंत ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम पूर्ण होऊनही पूर्णक्षमतेने सांडपाणी वळविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. यापूर्वीही दोनवेळा रंकाळ्यासाठी केंद्राच्या तलाव संवर्धन योजनेतून निधी मिळाला. मात्र, रंकाळ्याचे दुखणे ‘जैसे थे’च आहे. (प्रतिनिधी)सांडपाण्याचे दुखणेशाम सोसायटी व साने गुरुजी वसाहतीतून आलेले सांडपाणी रंकाळ्यात मिसळते. केंदाळ समूळ नष्ट करण्यासाठी १५ लाख रुपये खर्च करून विव्हिल किडे सोडण्यात आले; पण जलपर्णी कमी झाल्या नाहीत. वरचेवर केंदाळाचे दुखणे वर तोंड काढतच असते. बोट खरेदी करण्याकरिता ४५ लाखांची तरतूद केली; पण गेल्या तीन वर्षांत अद्याप ती खरेदी केली नाही. बोटीमुळे पर्यटनाबरोबरच पाणी ढवळून पाण्यातील आॅक्सिजन वाढण्यासाठीही मदत होणार आहे. प्रशासनाची उदासीनताच रंकाळ्याचे दुखणे वाढवीत आहे.नुसताच ‘प्लॅन’ तलावाभोवती चोहोबाजूंनी असलेल्या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. पडत चाललेल्या संरक्षक भिंतींसह रंकाळ्याची संपूर्ण डागडुजी व मजबुतीकरणासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याच्या सूचना आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी देऊन सहा महिने उलटले; मात्र, हा ‘प्लॅन’ काही प्रत्यक्षात ‘अ‍ॅक्शन’मध्ये उतरलाच नाही.उपायांची गरज संपूर्ण पाणी उपसून गाळ काढणे.अतिरिक्त झालेले पाणी बाहेर जाण्याची सोय करणे.तटबंदीचे वयोमान संपल्याने मजबुतीकरणाची गरज.नैसर्गिक पुनर्भरणासाठी धरण सुरक्षा संस्थेच्या तज्ज्ञांची मदत घेणे.तत्काळ निधीची उपलब्धता करून कामास सुरुवात करणे.