कुरुंदवाडमध्ये विनामास्क वाहनधारकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:37 IST2021-02-23T04:37:26+5:302021-02-23T04:37:26+5:30

कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरात कोरोनाचा शिरकाव होऊ नये ...

Action against unmasked vehicle owners in Kurundwad | कुरुंदवाडमध्ये विनामास्क वाहनधारकांवर कारवाई

कुरुंदवाडमध्ये विनामास्क वाहनधारकांवर कारवाई

कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी मुख्याधिकारी जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. शहरातील व्यावसायिक, दुकानदार, नागरिकांना मास्क तसेच सुरक्षित अंतराची सक्ती करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांवर पालिका प्रशासन दंडात्मक कारवाई करत आहे. शिवाय शिवतीर्थ चौक, सन्मित्र चौक, माळभाग, बसस्थानक आदी प्रमुख ठिकाणी पोलीस व पालिका कर्मचारी गस्त घालत असून, मास्क नसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. मुख्याधिकारी जाधव यांच्या धडक कारवाईने विनामास्क वाहनधारकांनी धास्ती घेतली आहे.

फोटो - २२०२२०२१-जेएवाय-०६

फोटो ओळ - कुरुंदवाड येथील शिवतीर्थ चौकात विनामास्क वाहन चालविणाऱ्यांना मुख्याधिकारी निखिल जाधव दंडात्मक कारवाई करत आहेत.

Web Title: Action against unmasked vehicle owners in Kurundwad