बेड न मिळाल्याने अपघातातील जखमीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:25 IST2021-05-26T04:25:15+5:302021-05-26T04:25:15+5:30

पाचगाव : कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील कावणे फाट्याजवळ झालेल्या अपघातातील सचिन बळवंत संकपाळ (वय 30, रा. कंदलगाव) या जखमी तरुणाचा ...

Accidental death due to lack of bed | बेड न मिळाल्याने अपघातातील जखमीचा मृत्यू

बेड न मिळाल्याने अपघातातील जखमीचा मृत्यू

पाचगाव : कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील कावणे फाट्याजवळ झालेल्या अपघातातील सचिन बळवंत संकपाळ (वय 30, रा. कंदलगाव) या जखमी तरुणाचा वेळेत बेड न मिळाल्याने सोमवारी रात्री १२ वाजता मृत्यू झाला, तर दुसरा जखमी सुशांत गणपती पाटील या तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, तो देखील गंभीर अवस्थेत आहे.

सचिन संकपाळ हा जमीन खरेदी-विक्री व्यवसायात असून, तो सोमवारी सायंकाळी दुचाकीवरून बोरवडे येथील पाहुण्यांकडे मित्र सुशांतला बरोबर घेऊन गेला होता. तेथून रात्री परतत असताना कावणे फाट्याजवळ त्याच्या दुचाकीला कारची जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील दोघेही जखमी झाले. या दोघांनाही कोल्हापूर येथे उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, कोरोनामुळे कोणत्याच रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने दोन तास त्यांना बेडसाठी शोधाशोध करावी लागली. अखेर सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाला; परंतु तेथे जाईपर्यंत सचिन यांचा रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुले, असा परिवार आहे.

Web Title: Accidental death due to lack of bed