शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस आजीवन कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फरसाण कंपनीतील मॅनेजरला आजीवन कारावास व दहा हजार रुपये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फरसाण कंपनीतील मॅनेजरला आजीवन कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. महात्मे यांच्या न्यायालयाने निकाल दिला.

राजीवकुमारसिंग हरिश शंकरसिंग (वय ३०, रा. हिस्सामुद्दीनपूर, ता. रानीपूर, उत्तर प्रदेश) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत फिर्याद पीडितेच्या आईने पोलिसात दिली होती. याप्रकरणी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व त्यांच्या पथकाने कसून तपास करत मोबाईलच्या लोकेशनवरून आरोपीस पकडले होते.

खटल्याची पार्श्‍वभूमी अशी की, राजीवकुमार सिंग हा २०१६ मध्ये फरसाण कारखान्यामध्ये मॅनेजर होता. तसेच पीडित मुलगीही येथे नोकरीला होती. तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न त्याने केला. तसेच खोलीत बोलावून तिच्यावर अत्याचार केले.

त्यानंतर आरोपी गुजरातमधील सुरतमध्ये वाॅचमनची नोकरी करत होता. तेथे तो १९ दिवस होता. दरम्यान, पीडितेच्या आईने वडगाव पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी टेक्निकल तपास करून दोघांना ताब्यात घेतले होते.

खटल्याचे कामकाज विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासमोर सुरू होते. विशेष सरकारी वकील अमिता. ए. कुलकर्णी यांनी १२ साक्षीदार तपासले. यामध्ये पीडित मुलगीसह अन्य साक्षीदार यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. युक्तिवादानंतर न्यायालयाने राजीवकुमार सिंगला विविध कलमांनुसार एकत्रित आजीवन कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला भारत शिंदे, महेंद्र चव्हाण, तत्कालीन तपास अधिकारी, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, दत्तात्रय कौलवकर, मिलिंद टेळी यांचे सहकार्य लाभले.

फोटो : २० राजीवकुमार सिंग आरोपी

फोटो : २० धनंजय जाधव, पीआय