बस वाहतूकदारांवरील कर रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:31 IST2021-09-09T04:31:29+5:302021-09-09T04:31:29+5:30

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुकारलेला लाॅकडाऊन काहीअंशी अजूनही सुरूच आहे. त्यामुळे बस वाहतूकदारांच्या बसेसवरील कर रद्द करावा, ...

Abolish taxes on bus carriers | बस वाहतूकदारांवरील कर रद्द करा

बस वाहतूकदारांवरील कर रद्द करा

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुकारलेला लाॅकडाऊन काहीअंशी अजूनही सुरूच आहे. त्यामुळे बस वाहतूकदारांच्या बसेसवरील कर रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर, सांगलीतील खासगी बस वाहतूकदारांतर्फे बुधवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्याकडे करण्यात आली.

राज्य शासनाने २२ मार्च २०२० पासून पहिला लाॅकडाऊन जाहीर केला. त्यामुळे आमच्यासह सर्व वाहतूक थांबली. त्यानंतर केंद्र सरकारने लाॅकडाऊन जाहीर केला. त्यानंतर आजतागायत काहीअंशी शिथिलता आणून हा सुरूच आहे. त्यामुळे टोल, बसेसवरील कर, रस्ते कर, बँकांच्या कर्जावरील व्याज माफ करावे, विमा हप्ताही कमी करावा, आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. मात्र, केवळ बंद काळातील ५० टक्के माफी दिली. ती नगण्य होती. त्यामुळे कोल्हापूरसह सांगलीतील बस व्यावसायिकांचे नुकसान झाले. नाॅन युज प्लस ही करमाफीही इतर जिल्ह्यांप्रमाणे आरटीओ कोल्हापूरने स्वीकारली नाही. त्यामुळे मोठे नुकसान झाले. यावेळी सतीशचंद्र कांबळे, बाबा बुचडे, गौरव कुसाळे, मनोज चौगुले, राजू ढाले, झाकीर तहसीलदार, रियाज मुजावर, दिलदार मुजावर, आदी उपस्थित होते.

Web Title: Abolish taxes on bus carriers