पोलीस ठाण्याच्या परिसरात मद्यपींचा उच्छाद

By Admin | Updated: December 19, 2014 23:31 IST2014-12-19T21:38:03+5:302014-12-19T23:31:36+5:30

पोलीस ठाण्यासमोरच असलेल्या कट्ट्याखाली गावठी दारू ढोसून मद्यपी विश्रांती घेत आहेत

The ablaze of alcohol in the area of ​​the police station | पोलीस ठाण्याच्या परिसरात मद्यपींचा उच्छाद

पोलीस ठाण्याच्या परिसरात मद्यपींचा उच्छाद

हातकणगंले : पोलीस ठाण्यासमोरच मद्यपींचा उच्छाद सुरू आहे. याचा विविध कामांसाठी येणाऱ्या महिला, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. हातकणंगले पोलीस ठाण्यासमोरील कट्ट्याजवळ दररोज मद्यपींचा अड्डा सुरू आहे. तहसील आणि पोलीस ठाण्यासमोरच असलेल्या कट्ट्याखाली गावठी दारू ढोसून मद्यपी विश्रांती घेत आहेत. नशेमध्ये शिव्यांची लाखोली आणि बडबड करीत हे मद्यपी दररोज तालुक्याला आलेल्या विद्यार्थी, महिला, ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांना त्रास देत असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The ablaze of alcohol in the area of ​​the police station