शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-ZP Election: महायुतीतच बिघाडी; कागलमध्ये मंडलिक एकटे लढणार; नेतेमंडळी कुठं, कोणाविरोधात शड्डू ठोकणार.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:23 IST

चंद्रकांत पाटील पालकमंत्र्यांच्या घरी

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास केवळ ४८ तास शिल्लक असताना महायुतीमध्येच सात तालुक्यांमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या त्या तालुक्यातील आमदार आपल्या कार्यकर्त्यांसाठी हट्टाला पेटल्याने सोमवारी रात्री उशिरापर्यंत बैठका होऊनही कागलवगळता कोणत्याही तालुक्याचा अंतिम निर्णय झाला नाही. आज मंगळवारी दुपारपर्यंत याबाबत ठोस निर्णय होतील. तर काँग्रेसने बारा तालुक्यांतील इच्छुकांच्या त्या त्या ठिकाणी मुलाखती घेतल्या असून खासदार शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांनी करवीर तालुक्यातील प्रमुखांशी सोमवारी चर्चा केली. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी गारगोटी येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.हातकणंगलेमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडीहातकणंगलेमध्ये भाजप, शिंदेसेना आणि जनसुराज्य या महायुतीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. तर काँग्रेस, स्वाभिमानी, उद्धवसेना आणि वंचित आघाडी यांनी एकत्र येऊन निवडणुकीची घोषणा केली आहे.शाहूवाडीत जनसुराज्यविरोधात भाजपशाहूवाडी तालुक्यात पक्षापेक्षा गटाच्या राजकारणाला महत्त्व आहे. विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांनी भाजपचा काही जागांचा प्रस्ताव फेटाळल्याने भाजपने स्वतंत्रपणे या ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.चंदगडमध्ये भाजप, शिंदेसेना एकत्रचंदगड तालुक्यात नगरपंचायतीचेच राजकारण पुढे चालण्याची चिन्हे दिसत आहेत. या ठिकाणी भाजप, शिंदेसेनाविरोधात दोन्ही राष्ट्रवादीसह काँग्रेस अशी लढाई होण्याची शक्यता आहे. आमदार शिवाजीराव पाटील हे स्वबळासाठी आग्रही असून पंचायत समितीच्या दोन जागा शिंदेसेनेला दिल्या जाऊ शकतात. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी या काँग्रेसच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहेत.कागलमध्ये मंडलिकांना वगळून महायुतीकागल तालुक्यात माजी खासदार संजय मंडलिक यांना वगळून मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे हे तिघे एकत्र आले आहेत. या तिघांमध्ये जागा वाटपही पूर्ण झाले असून जिल्हा परिषदेच्या सहा जागांपैकी तीन राष्ट्रवादीला आणि तीन भाजपला असेही निश्चित जागा वाटप अंतिम करण्यात आले आहे. त्यामुळे मंडलिक गटाला एकाकी लढत द्यावी लागणार आहे.शिरोळमध्ये भाजप, यड्रावकर युतीचा निर्णय आजशिरोळ तालुक्यात काँग्रेस, स्वाभिमानी व उद्धवसेना एकत्र या निवडणुका लढवणार असून दुसरीकडे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीने स्वतंत्र चूल मांडली आहे. या सर्व घडामोडीत भाजप स्वतंत्र लढणार की यड्रावकरांसोबत जाणार यावरच अंतिम लढतीचे चित्र अवलंबून आहे.पन्हाळ्यात मैत्रीपूर्ण लढतीची शक्यतापन्हाळा तालुक्यातील प्रत्येकी एक जागा भाजप आणि शिंदेसेना यांना देऊन उर्वरित सर्व जागा लढवण्यासाठी जनसुराज्यची तयारी आहे. परंतु, या ठिकाणी आमदार चंद्रदीप नरके आणि जादा जागेचा आग्रह धरला तर मात्र भाजप, जनसुराज्य विरुद्ध शिंदेसेना अशी लढत होऊ शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशीही आघाडी या ठिकाणी करण्यासाठी चाचपणी सुरू आहे.गडहिंग्लज तालुक्यात तिरंगी लढतीची शक्यतागडहिंग्लज तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी तिरंगी लढतीचे संकेत आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) आणि (शरद पवार) या दोन्ही गटांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. घड्याळ चिन्हावर लढायचे की आघाडीच्या चिन्हावर एवढाच मुद्दा बाकी आहे. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष व जनता दल एकत्र येणार आहेत. काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, उद्धवसेना आणि मनसे यांची आघाडी मैदानात उतरणार आहे. जनसुराज्य शक्ती, शिंदेसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, उद्धवसेनाही काही जागांवर रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.करवीरमध्ये महायुतीचे ठरेना, काँग्रेसची उमेदवार चाचपणीकरवीरमध्ये महायुती एकसंध राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. खासदार धनंजय महाडिक व आमदार चंद्रदीप नरके यांच्यातील सोमवारची चर्चा अपूर्ण राहिली आहे. राष्ट्रवादीला सोबत घेण्याची नरके यांची मानसिकता नाही.आजऱ्यात आघाडीपाठोपाठ महायुतीमध्येही बिघाडीआजरा तालुक्यात कार्यकर्त्यांनीच महाविकास आघाडीपाठोपाठ महायुतीमध्येही बिघाडी झाल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसचे नेते धनुष्यबाण व कमळाला हातात घेऊन निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकणार आहेत. त्यामुळे तालुक्यात तिरंगी लढत होणार आहे. महायुतीबरोबर भाजपचे न जुळल्यामुळे पेरणोलीमधून सुधीर देसाई तर उत्तूरमधून शिरीष देसाई यांची नावे दोन राष्ट्रवादी व ठाकरे सेनेकडून जाहीर झाली आहेत. भाजप व शिंदेसेनेचेही उमेदवारीवरून फिस्कटले आहे.भुदरगडमध्ये संभ्रम कायमभुदरगड तालुक्यात राजकीय सस्पेन्स शिगेला पोहोचला आहे. अद्याप कोणत्याही आघाड्या निश्चित न झाल्याने महायुती व महाविकास आघाडीत सध्या शांतता आहे. केवळ चर्चेच्या फैऱ्या झडत आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या तालुक्यातच महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी(अजित पवार)चे नेते माजी आमदार के. पी. पाटील हे त्यांचे राजकीय विरोधक असल्याने युती होणार का, त्यातून समाधानकारक जागा वाटप हा बिघाडीसाठी कळीचा मुद्दा ठरू शकतो.राधानगरीत शिंदेसेना, भाजप युतीची शक्यताराधानगरी तालुक्यात शिंदेसेना आणि भाजप एकत्र येण्याच्या तयारीत असून राहुल पाटील यांचा गट वगळून राष्ट्रवादी (अजित पवार) नाराजांना घेऊन लढण्याच्या स्थितीत आहे. ए.वाय. पाटील, राहुल पाटील आणि शेकाप एकत्र येण्याची शक्यता असून काँग्रेसची भूमिका अजून गुलदस्त्यात आहे. उद्धवसेना, जनता दल संभ्रमावस्थेत आहे.गगनबावड्यात महायुती शक्यगगनबावडा तालुक्यातील दोनपैकी एक जागा शिंदेसेना आणि एक जागा भाजपला देऊन युती शक्य असल्याचे दिसून येते. या ठिकाणी काँग्रेसकडून दोन्ही जागा लढवल्या जातील.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP Election: Cracks in Mahayuti, Mandaliks to fight alone.

Web Summary : Mahayuti faces setbacks in Kolhapur ZP elections as seat-sharing disagreements persist across several talukas. Mandaliks will contest independently in Kagal. Congress explores alliances while local dynamics shape varied contests across constituencies.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५MahayutiमहायुतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारcongressकाँग्रेस