शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
3
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
5
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
6
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
7
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
8
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
9
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
10
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
11
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
12
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
13
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
14
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
15
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
16
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
17
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
18
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
19
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
20
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji Municipal Election 2026: जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटील यांच्यासोबत सांगलीत चर्चेची फेरी, राष्ट्रवादीबरोबर तिढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:17 IST

Ichalkaranji Municipal Election 2026: पहिल्याच महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाकडे मोठ्या संख्येने उमेदवारी मागणी झाली

इचलकरंजी : महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडे मोठ्या प्रमाणात उमेदवारी मागणी झाली आहे. त्यात महायुतीसाठी घटक पक्षांसोबतच्या आकड्यांचाही मेळ बसेना. या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची सांगलीत जाऊन भेट घेतली. इचलकरंजीतील उमेदवारी आणि घटक पक्षांच्या प्रश्नांवर चर्चा केली. त्यांच्या माध्यमातून अन्य पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर पुढील घोषणा होणार आहेत.

पहिल्याच महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाकडे मोठ्या संख्येने उमेदवारी मागणी झाली आहे. त्यातून योग्य उमेदवार निश्चित करताना नाकीनऊ येत आहे. बंडखोरी होऊ नये, यासाठीही काळजी घ्यावी लागत आहे. त्यानुसार चाचपणी सुरू असून, त्याची यादी व उमेदवारांबाबतची चर्चा करण्यासाठी त्याचबरोबर महायुतीसंदर्भात घटक पक्षांकडून मागितलेल्या जागा याबाबत चर्चा करण्यासाठी आमदार आवाडे, हाळवणकर आणि प्रकाश आवाडे असे तिघेजण सांगली येथे जाऊन सांगलीचे पालकमंत्री पाटील यांच्याशी चर्चा केली. या चर्चेमध्ये पुढील निर्णय घेण्यासंदर्भात अन्य घटक पक्षांच्या प्रमुखांसोबत बोलणी झाल्यानंतर पुढे आकडे निश्चित होतील.

राष्ट्रवादीबरोबर तिढा

राष्ट्रवादी अजित पवार गटाचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे. त्याबद्दल यापूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेल्या चर्चेत मार्ग निघाला नव्हता. त्यांनी ठराविक जागांवर महायुती, तर उर्वरित जागांवर मैत्रीपूर्ण लढतचा निर्णय दिला होता. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार हे लक्ष घालत असल्याने त्यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतरच हा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji Election: Patil discusses seat-sharing; deadlock with NCP persists.

Web Summary : BJP faces high demand for Ichalkaranji election tickets. Allies negotiations continue. Patil met with leaders to discuss seat allocation. NCP deadlock persists, awaiting Ajit Pawar's decision after prior talks.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Mahayutiमहायुतीchandrakant patilचंद्रकांत पाटीलPrakash Awadeप्रकाश आवाडे