Kolhapur News: अपघातात बाळ-बाळंतिणीचा मृत्यू, संतप्त जमावाने पेटवली कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 13:08 IST2026-01-17T13:08:07+5:302026-01-17T13:08:34+5:30

संतप्त जमावाचा नेसरी पोलिस ठाण्यावर मोर्चा : गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई झाल्याचा आरोप

A mother and child died in an accident on the Chandgad Gadhinglaj state highway The crowd set the car on fire | Kolhapur News: अपघातात बाळ-बाळंतिणीचा मृत्यू, संतप्त जमावाने पेटवली कार

Kolhapur News: अपघातात बाळ-बाळंतिणीचा मृत्यू, संतप्त जमावाने पेटवली कार

नेसरी : अपघातातील बाळंतिणीचा मृत्यू आणि अपघातासकारणीभूतकार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई झाल्याच्या रागातून संतप्त जमावाने कार पेटवली, तसेच नेसरी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून पोलिस उपनिरीक्षक आबा गाढवे यांना निलंबित करण्याची मागणी केली.

चंदगड-गडहिंग्लज राज्य मार्गावर गुरुवारी दुपारी हा अपघात झाला. अडकूर येथील राहुल विजय कुंदेकर हे आठवड्यापूर्वी झालेली पत्नी सुवर्णा, सात दिवसाच्या नवजात बाळ, सासू व २ वर्षांचा मुलासह चारचाकी कारने (एमएच ०४ डीएन ३७४९) गडहिंग्लजहून अडकूरकडे जात होते.

दरम्यान, चंदगडकडून कोल्हापूरकडे जाणा-या चारचाकी कारने (एमएच ०९ जीए ७५१५) त्यांच्या कारगाडीला कानडेवाडीनजीक धडक दिली. धडकेत कुंदेकर यांच्या कारमधील सर्वजण गंभीर जखमी झाले. त्यातील जखमी बाळंतीण सुवर्णा यांचा शुक्रवारी पहाटे उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या अडकूर ग्रामस्थांसह जमावाने नेसरी पोलिस ठाण्यावर धडक मारली.

अपघातास कारणीभूत कार चालक स्वप्निल रवींद्र रानगे (रा.कोल्हापूर) याला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, मृत बाळंतिणीचे पार्थिव आणि अंत्यसंस्कारासाठी आणलेली लाकडे पोलिस ठाण्यासमोर आणली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, सरपंच गिरीजादेवी शिंदे यांच्यासह अडकूर ग्रामस्थांनी उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांच्याकडे सपोनि.आबा गाढवे यांना निलंबित करण्याची मागणी केली.

कुंदेकर कुटुंबीयांना धक्का

राहुल यांचे वडील विजय कुंदेकर यांचे ४ जानेवारीला अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर ९ जानेवारीला सुवर्णा हिने बाळाला जन्म दिला. मात्र, बाळाला घरी घेऊन जाताना झालेल्या अपघातात पत्नीला काळाने गाठले. त्यामुळे राहुल यांच्यासह कुंदेकर कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

नवजात बालकाचाही मृत्यू

ग्रामीण रुग्णालयात जन्मलेले बाळ घरी घेऊन जाताना अपघातात जखमी झाले होते. त्याच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते. शुक्रवारी आठ दिवसांच्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आईपाठोपाठ बाळाचाही मृत्यू झाल्याने अडकूर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आश्वासनानंतर जमाव शांत

दरम्यान, शुक्रवारी सकाळी अपघातास कारणीभूत ठरलेल्या आरोपीची कारगाडी जाळली. कार चालकाला अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.

Web Title : कोल्हापुर: दुर्घटना में माँ, नवजात की मौत; भीड़ ने कार जलाई

Web Summary : कोल्हापुर में एक दुखद दुर्घटना में एक नई माँ और उसके एक सप्ताह के बच्चे की जान चली गई। पुलिस कार्रवाई में देरी का आरोप लगाते हुए, आक्रोशित ग्रामीणों ने जिम्मेदार कार को जला दिया और एक पुलिस अधिकारी के निलंबन की मांग की। समुदाय के शोक में डूबने से तनाव बढ़ गया।

Web Title : Kolhapur: Accident Kills Mother, Newborn; Mob Sets Car Ablaze

Web Summary : A tragic accident in Kolhapur claimed the lives of a new mother and her week-old baby. Outraged villagers, alleging delayed police action, torched the car responsible and demanded the suspension of a police officer. Tensions rose as the community mourned the devastating loss.