महाविद्यालयीन तरुणीची राहत्या घरातील आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 20:32 IST2024-04-29T20:32:04+5:302024-04-29T20:32:13+5:30

सडोली (खालसा) -कोथळी (ता.करवीर) येथील महाविद्यालयीन युवतीने  राहत्या घरातील स्वयंपाक घरात दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. सानिका संभाजी कुंभार (वय ...

A college girl committed suicide | महाविद्यालयीन तरुणीची राहत्या घरातील आत्महत्या

महाविद्यालयीन तरुणीची राहत्या घरातील आत्महत्या

सडोली (खालसा) -कोथळी (ता.करवीर) येथील महाविद्यालयीन युवतीने  राहत्या घरातील स्वयंपाक घरात दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. सानिका संभाजी कुंभार (वय 22)त्या युवतीचे नाव असून ही घटना सोमवारी सकाळी घडली असून  या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे. 

अधिक माहिती अशी की कोथळी (ता.करवीर) येथील सानिका संभाजी कुंभार ही युवती भोगावती महाविद्यालयात बी कॉम च्या शेवटच्या वर्षोत शिकत होती. सोमवारी सकाळी नऊच्या  दरम्यान घरात कोणी नसल्याचे पाहून स्वयंपाक घरात दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. उपचारासाठी सी. पी. आर. रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मुत्यु झाला होता. मुत्युचे कारण समजू शकले नाही. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास करवीर पोलीस करत आहेत. 

Web Title: A college girl committed suicide