शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

माणसांना झालेय तरी काय.., चिरडू लागलेत मुके प्राणी खुशाल, कोल्हापुरात वासराला गाडीखाली चिरडण्याचा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 13:08 IST

तीन दिवसांतील दुसरी घटना

कोल्हापूर : गाडीखाली सापडलेल्या वासराला वाचविणाऱ्या कासावीस गायीची थरारक घटना रविवारी कोल्हापुरात भरदुपारी घडली. या घटनेनंतर चुकीच्या पद्धतीने वाहन चालवत मुक्या प्राण्यांना खुशाल चिरडणाऱ्या माणसांना झालेय तरी काय, त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राजारामपुरीतच एका चालकाने अंगावर गाडी घालून रस्त्यावर बसलेल्या वासराला ठार मारल्याच्या प्रकाराला तीन दिवसच झाले असतानाच रविवारीही असा प्रकार उघडकीस आला.राजारामपुरी येथील सहाव्या गल्लीतील महापालिकेच्या उद्यानाजवळ रविवारी भर दुपारी एका बड्या बापाच्या पोराने रस्त्यावर बसलेल्या एका गायीच्या वासराला कारखाली चिरडले. हा प्रकार दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. वासराचा शरीराचा अर्धा भाग मुंडके आणि पाय गाडीखाली अडकले. आपल्या वासराची अशी स्थिती गायीला पाहवली गेली नाही. तिने गाडीच्या चारही बाजूंनी फेऱ्या मारायला सुरुवात केली. हा प्रकार राजारामपुरी येथील कर्मा असोसिएशन ॲनिमल रेस्क्यू टीमचे सदस्य प्रशांत साठे यांना समजली. नेमके ते राजारामपुरी पोलिसासमवेत गुरुवारी एका वासराला गाडीखाली चिरडून ठार मारल्याप्रकरणात गायीचा पंचनामा करण्यासाठी जवळच होते. ते तत्काळ धावून गेले, तेव्हा गाडीखाली वासरू अडकेलेले होते. अस्वस्थ गायीला फेऱ्या मारताना पाहून लोकांनी त्वरित बचावकार्य सुरू केले.तेथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले, पण गाडीखाली सापडलेल्या वासराला वाचविण्यासाठी गायीची धडपड सुरू होती. वासराला वाचवायचे कसे ते तिला समजत नव्हते, त्यातूनच मदत करणाऱ्या लोकांच्या अंगावर ती धावून जात होती. कोणालाही जवळ येऊ देत नव्हती. हा प्रकार जवळपास पंधरा मिनिटे सुरू होती.हंबरुन वासराले चाटते जवा गाय..'हंबरुन वासराले चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामधी दिसते माही माय', या स्व. प्रा. स.ग. पाचपोळ यांच्या कवितेच्या ओंळीची प्रचिती गाडीखाली सापडलेल्या वासराला वाचविण्यासाठी धडपड करणाऱ्या गायीला बघून येत होती.

यांनी केली मदतअखेर गायीचे लक्ष दुसरीकडे वळवून ॲनिमल रेस्क्यू टीमचे सदस्य प्रशांत साठे, शुभम दीक्षित आणि गायत्री गोरक्ष संस्थेचे शिवा गडकरी, अमेय ढवळे, आशिष खरबडे, सुजित हिरेमठ यांनी रस्त्यावर जमलेल्या नागरिकांच्या मदतीने प्रसंगावधान दाखवत गाडी वर उचलून वासराला सुखरूपपणे बाहेर काढले. पांजरपोळचे डॉ. राजकुमार बागल यांनी या वासरावर उपचार केले. मुका मार लागल्याने त्यांनी वासराला पेन किलर आणि धनुर्वाताचे इंजेक्शन देऊन तिचा जीव वाचवला. तिला आईसोबत पाठवून दिले.