शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
6
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
7
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
8
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
9
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
10
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
11
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
12
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
13
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
14
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
Daily Top 2Weekly Top 5

९ तारखेच्या सरपंच मोहिमेची गावात खलबते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST

एरवी निवडणूक होण्यापूर्वी सरपंच पदाचे आरक्षण ठरलेले असायचे. मात्र यावेळी निवडणूक निकालानंतर हे आरक्षण काढले गेले आहे. त्यानंतर सरपंच ...

एरवी निवडणूक होण्यापूर्वी सरपंच पदाचे आरक्षण ठरलेले असायचे. मात्र यावेळी निवडणूक निकालानंतर हे आरक्षण काढले गेले आहे. त्यानंतर सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ठरल्या आरक्षणाप्रमाणे पात्र ठरलेल्या उमेदवारांनी आपापली फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. आपापल्या नेतेमंडळींना विश्वासात घेऊन आपलीच वर्णी सरपंच व उपसरपंचपदी लागावी यासाठी धडपड सुरू आहे. अनेकांच्या अर्धांगिनी तथा सौबाई या गावाच्या कारभारणी होणार आहेत. त्यासाठी 'पतिराजां'चीही घालमेल सुरू आहे. गावातील पारावर, चौकातील कट्ट्‌यावर, थंडीच्या शेकोटीसमोर, कोण, कुठे सरपंच होणार, का होणार, याचीच चर्चा खेड्यापाड्यात रंगत आहे.

निकालानंतर थंड झालेले गावाचे राजकारण आता या सरपंच निवडीच्या निमित्ताने पुन्हा तापले आहे. यामध्ये नेतेमंडळींची थोडीशी कसरत होणार आहे. सरपंचपद खुले असणाऱ्या ठिकाणी एकाला संधी देताना दुसऱ्या इच्छुकाची मनधरणी करावी लागत आहे. अनेकांनी अन्य सदस्यांना विश्वासात घेऊन आपले नाव सरपंच-उपसरपंच पदावर कोरण्यासाठी जोरकस प्रयत्न चालवले आहेत. एकूणच गावाकडे खलबते सरपंच मोहिमेची चालवली जात आहेत.