शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगलेतील ८२ संस्था बिनविरोध

By admin | Updated: December 19, 2014 23:35 IST

अद्याप ६७७ संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही.

हातकणंगले : हातकणंगले तालुक्यातील ‘ड’ वर्गातील ८२ सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या, तर ‘क’ वर्गातील ७०४ संस्थांपैकी २७ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. अद्याप ६७७ संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. मुदत संपलेल्या संस्थांचा कर्मचारी उपलब्धतेनुसार कार्यक्रम ३१ डिसेंबरअखेर टप्प्याटप्प्याने सुरू करणार असल्याची माहिती तालुका उपनिबंधक सुनील सिंगतकर यांनी दिली.तालुक्यातील ‘ड’ वर्गातील हौसिंग, पाणीपुरवठा, मजूर अशा ९० संस्थांपैकी ८२ संस्थांच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. पाच संस्था ‘ड’ वर्गातून ‘क’ वर्गाकडे वर्ग करण्यात आलेल्या आहेत, तर एका संस्थेची निवडणूक पूर्ण झाली आहे. ‘ड’ वर्गातील निवडणुकीचा कार्यक्रम ३० नोव्हेंबरअखेर पूर्ण झाला आहे. ‘क’ वर्गातील ७०४ पात्र संस्थांपैकी ३१ मार्च २०१३ अखेर मुदत संपलेल्या १९५ संस्था, तर ३१ आॅक्टोबर २०१४ अखेर मुदत संपलेल्या ५०९ संस्थांचा समावेश आहे. ‘क’ वर्गातील एकूण ७०४ पैकी २७ संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. उर्वरित संस्थांचा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे.निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेनुसार ‘ड’ आणि ‘क’ वर्गातील निवडणुका पूर्ण झाल्यानंतर ‘ब’ आणि ‘अ’ वर्गातील संस्थांचा निवडणूक कार्यक्रम सुरू होणार असल्याचे मत उपनिबंधक सुनील सिंगतकर यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)