शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: ईर्षा, तणाव, बंडखोरी; ८१८ जणांची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 18:57 IST

४२ माजी नगरसेवक मैदानात.. भाजप-शिंदेसेनेमध्ये बंडखोरीचा उद्रेक..

कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक किती चुरशीची असेल याची चुणूक मंगळवारी नामनिर्देशनपत्रे भरण्याच्या शेवटच्या दिवशी दिसून आली. सर्वच उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांनी सवाद्य मिरवणुकीने जाऊन आपले नामनिर्देशपत्रे भरण्यावर जोर दिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये असलेले परिसर गर्दीने फुलून गेले. पक्षीय उमेदवारी नाकारल्याने विविध पक्षांत नाराजी, बंडखोरीचे नाट्यदेखील कमालीचे रंगले.

उमेदवारी अर्ज दाखल करायच्या अखेरच्या मंगळवारी एकाच दिवशी ६१३ उमेदवारांनी त्यांची नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केली. त्यामुळे आतापर्यंत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या ८१८ वर पोहोचली आहे. मोठ्या संख्येने नामनिर्देशनपत्रे दाखल झाल्याने ती दाखल करून घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

माजी महापौरही पुन्हा रिंगणात..

माजी महापौर हसीना फरास, स्वाती यवलुजे, माधवी गवंडी यांनी पुन्हा एकदा महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. तर माजी महापौर निलोफर आजरेकर यांचे पती आश्कीन आजरेकर, वंदना बुचडे यांचे पती सुभाष बुचडे, प्रतिभा नाईकनवरे यांचे पती प्रकाश नाईकनवरे, शोभा बोंद्रे यांचे पुत्र इंद्रजित बोंद्रे व सून मयूरी बोंद्रे निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

अरे बापरे.. ४२ माजी नगरसेवक मैदानात..

माजी उपमहापौर भूपाल शेटे, संजय मोहिते, प्रकाश पाटील, अर्जुन माने यांच्यासह ४२ माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामध्ये महायुतीकडून २२, तर काँग्रेसकडून २० माजी नगरसेवक निवडणूक लढविणार आहेत. काही माजी नगरसेवकांनी त्यांची पत्नी, पुत्र, पती असलेल्या २१ जणांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. माजी नगरसेवक राहुल माने व त्यांच्या पत्नी ऋग्वेदा माने दोघेही निवडणूक लढवीत आहेत. राजेश लाटकर, शारंगधर देशमुख, तसेच आमदारपुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनाही त्यांच्या पक्षाने उमेदवारी दिली आहे.

भाजप-शिंदेसेनेमध्ये बंडखोरीचा उद्रेक..

भाजप, शिंदेसेना या पक्षांत उमेदवारी न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला. इतकी वर्षे पक्षाशी बांधील राहून देखील उमेदवारी न मिळाल्यामुळे काहींनी थेट बंडखोरी करून नामनिर्देशनपत्रे भरली आहेत. काँग्रेसमध्येही एक-दोन ठिकाणी बंडखोरी झाली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी याद्या उशिरा जाहीर करूनही उमेदवारांनी पुढे काय करायचे हे ठरवून ठेवले होते. आता हे बंडखोर माघार घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘एबी’ फॉर्म काही तास आधी हाती

भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातर्फे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या आधी काही तास पक्षाने ‘एबी’ फॉर्मचे वाटप केले. त्यामुळे उमेदवारांची सोमवारची रात्र अतिशय तणावात गेली. ‘एबी’ फॉर्म हाती पडताच हा तणाव क्षणात निवळला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Election 2026: Rivalry, Tension, Rebellion; 818 Nominations Filed

Web Summary : Kolhapur's municipal election is heating up with 818 nominations filed amid party infighting. Former mayors and relatives of politicians are contesting. Rebellion is brewing in BJP and Shinde Sena over ticket distribution. Parties distributed 'AB' forms late, causing tension.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी