शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election Voting: कोल्हापूर जिल्ह्यात ईर्ष्येने ७८.८७ टक्के मतदान; काही ठिकाणी हमरीतुमरी, बाचाबाची, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 11:52 IST

५६ नगराध्यक्ष, ८०० नगरसेवकपदांसाठीच्या उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद

कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींसाठी मंगळवारी ३१८ केंद्रांवर चुरशीने ७८.८७ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान मुरगुड पालिकेत नोंदविण्यात आले. बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट मशीनवरून कागलमध्ये सकाळी काहीसा गोंधळ उडाला तर गडहिंग्लजमध्ये बोगस मतदान करताना रोखल्यानंतर काहीसा तणाव निर्माण झाला होता. त्याचबरोबर हुपरी, शिरोळ, जयसिंगपूर, पेठवडगावमध्ये हमरीतुमरी, बाचाबाचीचे प्रकार घडले. तेरा नगराध्यक्षपदासाठी ५६ उमेदवार व २५४ नगरसेवकपदांसाठीच्या ८०० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. गडहिंग्लजमधील एका प्रभागाचे मतदान दि. २० डिसेंबरला होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार निकालासाठी मात्र २१ डिसेंबरपर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे.जिल्ह्यात गेले पंधरा दिवस प्रचाराचा धुरळा उडाला होता. महायुती आणि महाविकास आघाडीबरोबरच महायुतीतील घटक पक्षांमध्येही आरोप-प्रत्यारोपांची राळ उडविण्यात आल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आली होती. मंगळवारी सकाळी साडेसातपासून ३१८ केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली. सकाळच्या टप्प्यात कागल, गडहिंग्लज या ठिकाणी काहीसा गोंधळ उडाला. दिवसभर शांततेत पण ईर्षेने निवडणूक प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळेच सकाळी अकरापर्यंत बहुतांशी नगरपालिकांसाठी ३२ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले होते. दुपारीही मतदानाचा वेग कायम राहिला, दीड वाजता सरासरी ४५.९० टक्के मतदान झाले होते, तर दुपारी साडेतीनपर्यंत ६२ टक्क्यांपर्यंत मतदान पोहोचले होते. सर्वाधिक मतदान मलकापूर नगरपालिकेसाठी तब्बल ७५ टक्के झाले होते. त्यानंतर मतदानाची गती कायम राहिली.

दुपारनंतर मतदारांचा शोध सुरूग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे येथे कमालीची ईर्षा पाहावयास मिळाली. सकाळपासूनच मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवारांची यंत्रणा सक्रिय होती. दुपारनंतर कोणाचे मतदान राहिले, त्यांचा शोध घेऊन त्याचे मतदान करून घेण्यासाठी धडपड सुरू होती.

हुपरीत सौम्य लाठीचार्जहुपरीत दोन्ही गटांत बाचाबाची झाल्याने पाेलिसांनी साैम्य लाठीचार्ज केला. हातकणंगले, शिरोळ, मुरगुडमध्ये हमरीतुमरीचा तर पेठवडगाव, जयसिंगपूरमध्ये किरकोळ बाचाबाची उडाल्याने तणाव निर्माण झाला.

असे झाले मतदान....नगरपालिका एकूण मतदान / झालेले मतदान / टक्केवारी

  • जयसिंगपूर ४९,७४७ / ३४९२२/ ७०.२०
  • मुरगुड १०,१२८ / ८,९५६ / ८८.४३
  • मलकापूर ४,९३६ / ४२९२  / ८६.९९
  • वडगाव २३,०४४/ १९,८७३/ ८६.२४
  • गडहिंग्लज ३०,१६१ / २२,१८७ / ७३.५६
  • कागल २८,७५३ / २३,२३३ / ८०.८०
  • पन्हाळा २,९६७ /  २,५१२/ ८४.६६
  • कुरुंदवाड २२,२२४ / १८,४३५ / ८२.९५
  • हुपरी २४,८०२ / २०,०५१ / ८०.८५
  • शिरोळ २४,५३९ / १९,०९६ /७७.८२

नगरपंचायत :

  • आजरा १४,६८६ / ११,४३४ / ७७.८६
  • चंदगड ८,३१५ / ६,९९१ / ८४.०८
  • हातकणंगले ११,४३७ / ९,६०६ / ८३.९९