शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक कुंभमेळ्यासाठी ७५० फुटांची महाज्योत

By admin | Updated: July 7, 2015 01:21 IST

१०८ दिवस पेटत राहणार : तमदलगे येथील शिरोळ मागासवर्गीय सूतगिरणीचा विशेष उपक्रम

जयसिंगपूर : तमदलगे (ता. शिरोळ) येथील दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीने नाशिक येथील स्ािंहस्थ कुंभमेळ्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी अंतराचे ३६१७ किलोमीटर लांबीची अखंड सूतापासून ज्योत विनामूल्य तयार केली आहे. या ज्योतीचे नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यात १४ जुलैला दीपप्रज्वलन होणार आहे. अशाप्रकारची महाज्योत तयार करण्याचा पहिलाच उपक्रम असून, याची गिनिज बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याचे औचित्य साधून श्री जयगोपाल गायत्री सिद्धपीठ मुंबई व मोहर ग्रामविकास शिक्षण प्रतिष्ठाण पुणे यांच्यावतीने नाशिक तपोवन परिसरात उभारलेल्या ठिकाणी अखंड सूतापासून ३६१७ किलोमीटर लांबीची विश्वशांतीसाठी महाज्योत प्रज्वलित केली जाणार आहे. महाज्योत तयार करण्याचे कार्य नुकतेच माजी मंत्री बबनराव घोलप व श्री १००८ श्री हिमालय पीठाधिश्वर जगद्गुरू रामानुचार्य श्री हिमालय बाबा यांनी सूतगिरणीस भेट देऊन सोपविले होते. याचा मान देऊन आमच्या संस्थेने हे काम तडीस नेले आहे. संस्थेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गेले दोन महिने कष्ट करून या महाज्योतीची निर्मिती केली. याची जाडी ३ इंच असून, लांबी ७५० फूट इतकी तर या महाज्योतीमधील धागा ३६१७ किलोमीटर लांबीचा अखंड असून, वजन २२० किलो आहे. ते पुढे म्हणाले, या ज्योतीसाठी कमलपुष्पाच्या आकाराचा महाकाय २४ बाय २४ फुटाचा दीप पुण्यामध्ये बनविला आहे. या ज्योतीला एक तासाला एक लिटर तिळाचे तेल वापरण्यात येणार आहे. नाशिक येथील तपोवन परिसरात मोठ्या आकाराचा खड्डा तयार करून येथे दीप बसविणार आहे. यामध्ये तिळाचे तेल टॅँकरद्वारे सोडण्यात येणार आहे. ज्योतीचे दीपप्रज्वलन १४ जुलै २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. ही ज्योत सलग १०८ दिवस तेवत राहणार असून, याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. महायज्ञाचे प्रयोजन भारतातील रोगराई, भूकंप, महादुष्काळ, महापूरहानी आणि जगातील मानवांच्या कल्याणासाठी केले आहे. (प्रतिनिधी)