शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी ७५ बदल्या

By admin | Updated: May 14, 2015 00:32 IST

जिल्हा परिषदेत धडाका : आज ग्रामपंचायत, सामान्य प्रशासन विभागातील प्रक्रिया

कोल्हापूर : जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका बुधवारपासून सुरू झाला. पहिल्या दिवशी कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, बांधकाम व महिला-बालकल्याण या विभागांतील ७५ बदल्या झाल्या. त्यामध्ये प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांचा समावेश आहे. आज, गुरुवारी ग्रामपंचायत व सामान्य प्रशासन विभागातील तर उद्या, शुक्रवारी शिक्षण विभागातील सर्वच संवर्गाच्या बदल्यांची प्रक्रिया राबविली जाईल. दरवर्षी जिल्हा परिषदेमध्ये बदल्यांची प्रक्रिया राबविली जाते. मे महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांत बदल्यांची लगबग पाहावयास मिळत आहे. त्यामध्ये दहा वर्षे एकाच ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या, पाच वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या तर आपसी बदल्यांचाही समावेश आहे. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता बदल्यांच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) वाघमारे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सायंकाळी पाचपर्यंतही प्रक्रिया सुरू होती. कृषी, महिला-बालकल्याण, पशुसंवर्धन, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य या विभागातील एकूण ७५ बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये प्रशासकीय बदल्या २०, विनंती बदल्या ५३ व आपसी बदल्या २ आहेत. बांधकाम विभागातील शाखा अभियंता, स्थापत्य अभियंता, पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, कृषि विभागातील कृषि अधिकारी, कृषि विस्तार अधिकारी, आरोग्य विभागातील औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सहाय्यक (पुरुष), आरोग्य पर्यवेक्षक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), आरोग्य सहाय्यक (महिला) या पदांचा पहिल्या दिवशी झालेल्या बदल्यांमध्ये समावेश आहे.आज, गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ग्रामपंचायत व सामान्य प्रशासन विभागातील सहा केडरमधील ४१ बदल्या होणार आहेत. त्यात ग्रामपंचायतीमधील २ व सामान्य प्रशासनामधील ४ बदल्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)