शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

आशेने यांत्रिकीकरण केले, नशिबी हेलपाटे; कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील लाभार्थीचे ७० कोटी थकीत 

By भीमगोंड देसाई | Updated: February 20, 2026 19:29 IST

नवीन मंजुरी थांबवली, शेती करणे अडचणीचे

भीमगोंडा देसाई 

कोल्हापूर : शासनाकडून अनुदान मिळणार म्हणून घरातील सोने, जमीन गहाण ठेवून, बँका, पतसंस्थांकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर, कृषी अवजारे व इतर यंत्रसामग्री खरेदी केलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील ७० कोटी अनुदान शासनाकडून थकले आहे. परिणामी कृषी विभागाने नवीन मंजुरी थांबवली आहे. अनुदानावर ट्रॅक्टर खरेदी करणारे मंजुरीसाठी तर अनुदान मिळणार म्हणून कृषी यंत्र खरेदी केलेले तालुका, जिल्हा कृषी कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत. अनेक महिने अनुदान थकल्याने ३ हजार ४५७ शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यांना बँकाच्या व्याजाचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे.

मंजूरटंचाईमुळे शेतीची मशागत, पेरणी, मळणी, काढणी, फवारणी, शेतमाल वाहतुकीसाठी ट्रॅक्टर आणि इतर यंत्रसामग्रीची गरज निर्माण झाली आहे. तुकड्यांच्या शेतीमुळे सर्वच शेतकऱ्यांना बैलजोडीचे संगाेपन करणे परवडत नसल्याने बहुतांशी शेतकऱ्यांना शेती यंत्रावरच अवलंबून राहावे लागते. म्हणून शेतकरी ट्रॅक्टर व त्याला आवश्यक ती अवजारे खरेदी करतो. ट्रॅक्टरची किंमत सात ते दहा लाखांपर्यंत तर अवजारांच्या किमती लाखांवर आहेत. यासाठी अनुदान मिळाले तर संबंधित शेतकऱ्यांना आधार मिळतो. म्हणून शेतकरी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरणाच्या योजनेतून अर्ज करतो.

अनुदानासाठी पात्र ठरल्यानंतर तो खरेदी करतो. पूर्ण रक्कम भरून ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर जीएसटीसह पावत्या कृषी विभागाकडे जमा केल्यानंतर शासनाकडून अनुदान येते. त्यानंतर कृषी प्रशासन संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होते. पण गेल्या अनेक महिन्यांपासून अनुदान थकले आहे. यामुळे लाभार्थी शेतकरी हवालदिल बनले आहेत.

अनुदान कमी तेही वेळेत नाही...

ट्रॅक्टर आणि इतर अवजारांच्या किमतीच्या तुलनेत मिळणारे अनुदान अत्यल्प आहे. यंत्राशिवाय शेती अशक्य असल्याने कर्जबाजारी होऊन शेतकरी ट्रॅक्टर, यंत्रे खरेदी करतात. पण अनुदानच थकल्याने लाभार्थीची आर्थिक कोंडी झाली आहे.

किती अनुदान मिळते?

आठ ते १२ एचपीपर्यंतच्या पॉवर ट्रेलरसाठी ८० हजार ते एक लाख रुपये, ११ एचपीवरील पॉवर ट्रेलरसाठी १ लाख २० हजार रुपये अनुदान मिळते. ट्रॅक्टरसह अवजारे दहा लाखांपर्यंत घेतल्यास चाळीस टक्के म्हणजे चार लाख, २५ लाखांपर्यंत यंत्रे खरेदी केली तर दहा लाखांचे अनुदान मिळते.

तीन जिल्ह्यांतील अनुदानाच्या प्रतीक्षेतील शेतकरी संख्या अशी

  • कोल्हापूर : ९५५
  • सांगली : १५९५
  • सातारा : ९०७


४३ कोटींचे अनुदान वाटप

तीन जिल्ह्यांतील पात्र लाभार्थीसाठी शासनाकडून मिळालेले ४३ कोटी रुपयांचे अनुदान वितरीत केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी १२ कोटी ५९ लाख सांगली जिल्ह्यात ११ कोटी १९ लाख, साताऱ्यासाठी १९ कोटी २६ लाखांचे अनुदान वितरीत झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mechanization Hopes Dashed: Farmers Await ₹70 Crore in Pending Subsidies

Web Summary : Farmers in Kolhapur, Sangli, and Satara face financial strain as ₹70 crore in agricultural mechanization subsidies remain unpaid. Over 3,457 farmers struggle with debt and interest, hindering agricultural progress due to delayed government support.