शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका घेणार ६० कोटींचे कर्ज

By admin | Updated: May 21, 2014 17:32 IST

थेट पाईपलाईन : महासभेची मंजुरी; निधीला कात्री लावू नका : नगरसेवक

कोल्हापूर : थेट पाईपलाईन योजनेतील महापालिकेच्या हिश्श्याची १० टक्के रक्कम तसेच भूसंपादनाच्या खर्चासाठी ६० कोटींचे कर्ज उभारण्याचा निर्णय आज, मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. प्रशासनाला सोयीप्रमाणे कर्ज उभारण्याची मुभा देण्यात आली. मात्र, यामुळे विकासकामांना कात्री लावू नका, अशी सूचनाही नगरसेवकांनी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सुनीता राऊत होत्या. शहरवासीयांचे तीन दशकांचे स्वप्न असलेली काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना निविदा प्रक्रियेत अडकले आहे. जादा दराने निविदा आल्याने त्याचा किमान ८० कोटींचा फटका महापालिकेला बसणार आहे. महापालिकेच्या हिश्श्याच्या ४२ कोटींसह किमान १२५ कोटी रुपयांचा भार सोसण्याची महापालिकेची कुवत नाही. यासाठी प्रशासनाने कोणती उपाययोजना केली आहे याची माहिती सभागृहास द्यावी, अशी जोरदार मागणी जयंत पाटील यांनी केली. हे पैसे उभारताना विकासकामांना कात्री लावू नका. कन्सल्टंटवर पूर्णपणे अवलंबून राहू नका, अशी मागणी भूपाल शेटे, आर. डी. पाटील, आदिल फरास यांनी केली. काळम्मावाडी योजनेला केंद्र सरकारच्या ‘युआयडीएसएसएमटी’ योजनेतील मंजूर ४२३.२२ कोटी निधीपैकी १९१ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. योजना सुरू करण्यास कोणतीही अडचण नाही. महापालिकेचा हिस्सा व भूसंपादनासाठी ६० क ोटींची तरतूद महापालिकेला करावी लागणार आहे. औरंगाबाद व नागपूर येथेही जादा दरसूचीमुळे महापालिकेला स्वत:चे पैसे द्यावे लागले आहेत. जादा दरसूचीच्या रकमेची पुढील वर्षी तरतूद करावी लागणार आहे. पाईपलाईन योजनेमुळे नगरसेवकांचा विकासनिधी कमी केला जाणार नाही, अशी माहिती आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिली. (प्रतिनिधी)