शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीतील ५५० डिजिटल फलक हटविले

By admin | Updated: July 4, 2016 00:32 IST

नगरपालिकेची कारवाई : सलग चार दिवस मोहीम

इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गेले चार दिवस डिजिटल फलक निर्मूलन करण्याच्या मोहिमेमध्ये सुमारे २०० मोठे फलक व ३५० लहान फलक काढून टाकले. परिणामी शहरातील मुख्य रस्त्यांसह त्यावरील चौकांनी मोकळा श्वास घेतला. फलक हटविण्याची मोहीम पालिकेने तीन स्वतंत्र पथकांमार्फत दोन पाळ्यांमध्ये राबविली. अवघ्या चार दिवसांत मोठ्या प्रमाणावर फलक हटविण्याची कारवाई पालिकेकडून प्रथमच करण्यात आली. गुरुवार, ३० जूनपासून या मोहिमेला सुरुवात केली होती. जुन्या नगरपालिकेपासून जनता चौक, शिवाजी पुतळा चौक, शाहू पुतळा चौक ते करवीर नाका, तसेच संभाजी चौक ते आंबेडकर पुतळा मार्गे स्टेशन रोडवरील कमान अशी व्यापक मोहीम चालविण्यात आली. यामध्ये दोन डंपर, दोन क्रेन आणि तीन गॅसकटरसह पालिकेचे अधिकारी व ६० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. मुख्य रस्त्यावरील लोखंडी खांब गॅसकटरच्या साहाय्याने कापून ते हटविले. त्याचबरोबर संभाजी चौक ते स्टेशन रोड आणि शाहू पुतळा ते करवीर नाका अशा रस्त्यांमधील दुभाजकांवरील ३५० लहान फलकसुद्धा कापून ते जप्त केले. धोकादायक कमान अखेर उतरविली करवीर नाका येथे नगरपालिकेची हद्द जेथून चालू होते, त्या ठिकाणी रस्त्यावर लोखंडी स्वागत कमान उभारण्यात आली होती. सुमारे पंधरा वर्षांपूर्वीची ही कमान असल्यामुळे त्याचे लोखंडी पाईप, अ‍ॅँगल व पत्रे गंजल्यामुळे ते धोकादायक झाले होते. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ही कमान हटविण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. त्याप्रमाणे शनिवारी मध्यरात्रीनंतर क्रेनच्या साहाय्याने ही कमान उतरविण्यात आली.