‘गोकुळ’चे ४० ठरावधारक कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST2021-04-27T04:25:27+5:302021-04-27T04:25:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून आतापर्यंत ‘गोकुळ’चे दोन ठरावधारकांचा काेरोना मृत्यू झाला आहे तर ...

40 resolution holders of 'Gokul' are coronated | ‘गोकुळ’चे ४० ठरावधारक कोरोनाबाधित

‘गोकुळ’चे ४० ठरावधारक कोरोनाबाधित

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून आतापर्यंत ‘गोकुळ’चे दोन ठरावधारकांचा काेरोना मृत्यू झाला आहे तर ४० ठरावधारक कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे प्रचार कसा करायचा? असा प्रश्न उमेदवारांसमोर आहे.

कोरोनामुळे ‘गोकुळ’ची निवडणूक कशी घ्यायची हा प्रश्न होता. त्यात उच्च न्यायालयाच्या आदेशाने ही प्रक्रिया सुरू झाली. मात्र, जिल्ह्यात कोरोनाच संसर्ग वाढत गेला. त्यामध्ये डोणोली (ता. शाहूवाडी) व बुबनाळ (ता. शिरोळ) येथील दोन ठरावधारकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत ४० ठरावधारक कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे या मतदारांपर्यंत कसे पोहोचायचे, असा प्रश्न उमेदवारांमध्ये आहे. जीव मुठीत घेऊन प्रचार यंत्रणा सुरू आहे.

कर्मचाऱ्यांचे आज प्रशिक्षण

‘गोकुळ’ निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे आज तालुकास्तरावर प्रशिक्षण घेतले जाणार आहे. ऑनलाईन प्रशिक्षणात मतदान व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची दक्षता आदी सूचना तहसीलदार देणार आहेत.

ठरावधारकांची उचलाउचली सुरूच

विरोधी आघाडीने ठरावधारकांची उचलाउचली सुरूच केली आहे. सत्तारूढ गटाने निवडणूक स्थगित होऊ शकते म्हणून सावध हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, सोमवारी त्यांनीही ठराव ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे. धामणी खोऱ्यातील सत्तारूढ गटाचे ३३ ठराव तालुक्यातच अज्ञातस्थळी हलवले आहेत.

Web Title: 40 resolution holders of 'Gokul' are coronated