शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचाच आवाज मोठा, सभागृहात दाखवा - शाहू छत्रपती; नूतन ३५ नगरसेवकांचा सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:31 IST

शाहूंचा विचार कुणीच पुसू शकत नाही

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस-उद्धवसेनेच्या ३५ विजयी उमेदवारांची संख्या लहान नाही. महापालिकेत काँग्रेस हा सर्वाधिक मोठा असून त्यांचा आवाजच सर्वांत मोठा आहे, त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी हा आवाज सभागृहात त्याच ताकदीने दाखवून द्या, असे आवाहन खासदार शाहू छत्रपती यांनी काँग्रेस-उद्धवसेनेच्या विजयी नगरसेवकांना मंगळवारी केले.महापालिकेत विजय मिळवलेल्या काँग्रेसच्या ३४, तर उद्धवसेनेच्या १ अशा ३५ नगरसेवकांचा सत्कार काँग्रेस कमिटीत खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कोल्हापुरी फेटा, पुष्पगुच्छ व संविधानाची प्रत देऊन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते.शाहू छत्रपती म्हणाले, महानगरपालिकेच्या निवडणुकीतून कोल्हापूरने एक वेगळी दिशा दिली आहे. येथील पुरोगामी विचार आजही बुलंद असल्याचा संदेश यातून दिला गेला आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांनी शहरातील प्रश्नांसाठी सभागृहात आपला आवाज कायमपणे बुलंद ठेवावा.आमदार जयंत आसगावकर म्हणाले, विजयी नगरसेवकांनी सभागृहात विरोधकांची भूमिका सक्षमपणे पार पाडावी. ऋतुराज पाटील म्हणाले, महायुतीत नेत्यांची फौज होती. मात्र, महाविकास आघाडीत जनतेची फौज असल्याचे या निकालाने दाखवून दिले आहे.स्वत:साठी एक मत मागितल्यामुळे घोळया निवडणुकीत काही उमेदवारांनी स्वत:साठी एक मत मागितल्यामुळे प्रभागांमधील चारही उमेदवार निवडून येण्यास अडचण झाली. ते एकटे सभागृहात जाऊन आपण सत्तेपर्यंत जाणार नाही, याची जाणीव त्यांना आता झाली असेल या शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी कानपिचक्या दिल्या.थोडक्यातील पराभवाची खंत, मात्र, लढाई केल्याचा अभिमानहीकाँग्रेसच्या काही जागा अगदी काठावर गेल्या आहेत. काही प्रभागांमध्ये थोडी ताकद लावली असती तर सत्ता मिळवली असती, सत्तेपर्यंत पोहोचता आले नसल्याची खंत सतेज पाटील यांनी बोलून दाखवली. महायुतीत तीन-तीन पक्षांची ताकद, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतानाही काँग्रेसने लढाई करुन ज्या पद्धतीने यश मिळवले त्याचा अभिमान असल्याचेही पाटील यांनी आवर्जून सांगितले.सतेज पाटील महाराष्ट्राचे नवे वाघकोल्हापुरात काँग्रेसने मिळवलेल्या यशाची संबंध महाराष्ट्राने नोंद घेतली आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई निकाराने लढून तुम्ही काँग्रेसचा विचार अधिक बुलंद केला आहे. त्यामुळे सतेज पाटील हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नवे वाघ ठरले आहेत या शब्दांत शाहू छत्रपती यांनी सतेज पाटील यांचे कौतुक केले.एकजूट, एकोपा कायम ठेवामालोजीराजे म्हणाले, महापालिकेत महायुतीचा विजय झाला असला तरी नैतिक विजय मात्र महाविकास आघाडीचाच झाला आहे. काही जागा थोडक्यात गेल्या. मात्र, ज्या पद्धतीने लढा दिला त्याने महाराष्ट्राला दिशा दिली आहे. त्यामुळे काँग्रेस-उद्धवसेनेच्या नगरसेवकांनी हाच एकोपा, एकजूट कायम ठेवावी.पराभूत उमेदवारांसोबत आज बैठक, त्यांना बळ देणारजे उमेदवार पराभूत झाले आहेत त्यांनाही सोबत घेणार आहे. त्यांना विजयी नगरसेवकांनी बळ द्यावे, अशी सूचना करत आज बुधवारी पराभूत उमेदवारांसोबत बैठक घेऊन संवाद साधणार असल्याचे सतेज पाटील म्हणाले. १६ प्रभागांमध्ये काँग्रेसला एक तरी जागा मिळाली आहे. मात्र, चार प्रभागांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. या प्रभागांमधील विकासकामांची जबाबदारी प्रत्येक नगरसेवकांना दिली जाणार असल्याचे सतेज पाटील यांनी जाहीर केले.शाहूंचा विचार कुणीच पुसू शकत नाहीशाहूंचा पुरोगामी विचार कुणी पुसू शकत नाही हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निकालाने सिद्ध झाल्याचे मालोजीराजे म्हणाले. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या लढाईत काँग्रेसच्या बाजूने जनशक्ती उभी राहिली. नूतन नगरसेवकांनी जनशक्तीचा आवाज आता सभागृहात दाखवावा असे आवाहन त्यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress Dominates: Shahu Maharaj Urges Strong Voice in Kolhapur Corporation

Web Summary : Shahu Maharaj urged newly elected Congress corporators to strongly voice people's concerns. Congress's victory proves progressive ideology remains strong in Kolhapur. Satej Patil was praised.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६congressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती