शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उपाध्यक्षांसह बांधकाम सभापतींना २५ लाख निधी

By admin | Updated: September 20, 2015 01:27 IST

सदस्यांनाही सात लाख : पालकमंत्र्यांची मध्यस्थी

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व बांधकाम सभापती यांना प्रत्येकी २५ लाख, तर सदस्यांना प्रत्येकी सात लाख रुपये निधी जिल्हा नियोजनमधून मिळणार आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत हा तोडगा काढण्यात आल्याने निधी वाटपावरून जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समितीमधील वादावर पडदा पडला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेकडील निधीत खासदार व आमदार यांचा हस्तक्षेप थांबवावा व जिल्हा नियोजन समितीकडील निधी सर्व सदस्यांना मिळावा, या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे सदस्य आक्रमक झाले होते. चार दिवसांपूर्वी अध्यक्षा विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जिल्हा नियोजनकडील निधीची मागणी केली होती. आमदार, खासदारांसाठी स्वतंत्र फंड असतो. तरीही ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामकाजात हस्तक्षेप करतात. परिणामी, स्थानिक स्वराज्य संस्था मोडकळीस आल्या आहेत. शासनाच्या नियमानुसार निधीचे वाटप करावे, अशी मागणी करत तसे केले नाही तर जिल्हा नियोजन समिती सदस्यांचे मतदान घेऊन संपूर्ण ४० कोटींच्या निधीचे वाटप करण्यास भाग पाडू, असा इशारा उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी दिला होता. या वादाचे पडसाद जिल्हा नियोजन मंडळाच्या शनिवारच्या बैठकीत उमटणार होते. बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील व उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्याबरोबर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाधिकारी अमित सैनी यांची बैठक झाली. यामध्ये अध्यक्षांना ४० लाख, उपाध्यक्ष व बांधकाम सभापतींना प्रत्येकी २५ लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समिती सदस्यांना साडेसतराऐवजी पंधरा लाख, तर जिल्हा परिषद सदस्यांना सात लाख रुपये निधी देण्यासही मंत्री पाटील यांनी मान्यता दिल्याने या वादावर पडला.