कुरुंदवाड पोलिसांकडून २३ मोटारसायकली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:43 IST2021-02-06T04:43:29+5:302021-02-06T04:43:29+5:30

कुरुंदवाड : गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील मोटारसायकल चोरी प्रकरणातील आरोपीकडून ७ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या २३ मोटारसायकली व ...

23 motorcycles seized from Kurundwad police | कुरुंदवाड पोलिसांकडून २३ मोटारसायकली जप्त

कुरुंदवाड पोलिसांकडून २३ मोटारसायकली जप्त

कुरुंदवाड : गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील मोटारसायकल चोरी प्रकरणातील आरोपीकडून ७ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या २३ मोटारसायकली व एक मोबाईल हॅन्डसेट जप्त केल्याची माहिती इचलकरंजी विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी पत्रकार बैठकीत दिली. तसेच या चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईला वीस हजारांचे बक्षीस उपअधीक्षक यांनी जाहीर करून पोलिसांच्या तपासाचे कौतुक केले. गणेशवाडी येथील मोटारसायकल चोरीप्रकरणी विजय सतीश कांबळे व पोपट रामू कांबळे (रा. उगार, कर्नाटक) यांच्यावर कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील विजय कांबळे या मुख्य आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास केला असता, कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूर, गांधीनगर, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, इचलकरंजी, हातकणंगले, गोकुळ शिरगाव, इस्लामपूर, मिरज व कवठेमहांकाळ आदी ठिकाणी त्याने २३ मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून पोलिसांनी ७ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या २३ मोटारसायकली व एक मोबाईल संच हस्तगत केला आहे. कुरुंदवाडचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ, पोलीस नाईक प्रदीप कुंभार, प्रकाश हंकारे, पोलीस कॉन्स्टेबल सागर खाडे, संजय मुंडे, संजय राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती उपअधीक्षक महामुनी यांनी दिली.

फोटो - ०४०२२०२१-जेएवाय-०४

फोटो ओळ - कुरुंदवाड पोलिसांनी जप्त केलेली वाहने.

Web Title: 23 motorcycles seized from Kurundwad police