शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी २ हजार जणांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:05 IST

कोल्हापूर : केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार शनिवारी (दि. १६) लसीकरण करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ...

कोल्हापूर : केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार शनिवारी (दि. १६) लसीकरण करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २० आरोग्य संस्था यासाठी निश्चित करण्यात आल्या असून यावर २ हजार जणांना लसीकरण करण्यात येणार आहे. लस पुरवठा करण्यासाठी वाहनेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील १२ ठिकाणी, तर कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रात ८ अशा २० ठिकाणी हे लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर ५ कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये एक लसटोचक, एक पाेलीस, एक डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि दोन सहायक यांचा समावेश आहे. सकाळी ९ ते ५ या कालावधीत प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे जिल्ह्यात २ हजारजणांना लस टोचण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

यासाठी पुण्यातून वाहनातून हे डोस उद्यापर्यंत कोल्हापुरात आणले जातील. सीपीआरच्या कोल्डचेनमध्ये ते ठेवण्यात येतील. कोल्डचेन संलग्न ठेवत १५ जानेवारी रोजी सांयकाळपर्यंत या २० केंद्रांवर हे डोस पोहोचवण्यात येणार आहेत. या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा पातळीवरून एक निरीक्षक अधिकारीही पाठविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई हे या सर्व लसीकरण प्रक्रियेचा आढावा घेत आहेत. राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश सााळे, डॉ. फारूक देसाई, डॉ. हर्षला वेदक यांच्यासह वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी या संपूर्ण प्रक्रियेचे नियोजन करत आहेत.

चौकट

या ठिकाणी होणार लसीकरण

सीपीआर मेडिकल कॉलेज, आयजीएम इचलकरंजी, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय, गांधीनगर उपजिल्हा रुग्णालय, कोडोली उपजिल्हा रुग्णालय, सेवा रुग्णालय कसबा बावडा, गारगोटी ग्रामीण रुग्णालय, हातकणंगले, कागल, शिरोळ, राधानगरी ग्रामीण रुग्णालय, पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्र ,कोल्हापूर महापालिकेचे आयसोलेशन रूग्णालय, महाडिक माळ, सदर बाजार नागरी आरोग्य केंद्र, सावित्रीबाई फुले, पंचगंगा रुग्णालय कोल्हापूर, राजारामपुरी, कसबा बावडा आणि फिरगांई नागरी आरोग्य केंद्र.