शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

भरारी पथकाकडून १८६ कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

कोल्हापूर : बियाणे व खतांच्या उपलब्धतेबरोबरच वाढीव दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर, कृषी विभागाने स्थापन केलेल्या १४ भरारी ...

कोल्हापूर : बियाणे व खतांच्या उपलब्धतेबरोबरच वाढीव दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर, कृषी विभागाने स्थापन केलेल्या १४ भरारी पथकांनी पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील १८६ कृषी सेवा केंद्रांना चांगलाच हिसका दाखवला. रजिस्टर तपासणीसह प्रत्यक्ष साठा देखील जाऊन तपासला गेल्याने कृषी सेवा केंद्राचे धाबेच दणाणले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्या नेतृत्वाखाली या पथकांनी झाडाझडती करत १८ दुकानांची आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेतली. आता त्यांच्यावर आज, सोमवार आणि उद्या, मंगळवारी सुनावणी ठेवण्यात आली असून खुलासा आल्यानंतर कारवाईची प्रक्रिया सुरू होणार आहे.

माॅन्सून तोंडावर आल्याने शेतकऱ्यांकडून बियाणे व खतांची मागणी वाढली आहे, पण उपलब्धता नसल्याचे सांगत अडवणूक होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाच्या हेल्पलाईनवर आल्या होत्या. त्याची तातडीने दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी शनिवारी १४ पथके स्थापन केली. प्रत्येक पथकात तीन अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला.

रविवारी लगेच या पथकांना सकाळी आठ वाजता प्रत्येक तालुक्यातील दहा ते १५ केंद्रे याप्रमाणे तपासणीचे आदेश काढले. त्यानुसार सकाळी ही पथके दुपारी दोनपर्यंत जिल्ह्यात फिरत राहिली. जादा दराने विक्री केल्याच्या तक्रारीत तथ्य आढळले. जादा दराने विकून कमी दराची पावती केल्याचीही उदाहरणे आढळली. साठा पुस्तक देखील अद्यावत ठेवले नसल्याचे आढळून आले. रेकॉर्ड तपासणीमध्ये बऱ्याच त्रुटी आढळल्या आहेत. पथकाने साठा देखील तपासला. शिवाय ज्यांनी बियाणे व खते खरेदी केली आहेत, त्यांच्याकडेही दराच्या बाबतीत चौकशी केली.

शेतकऱ्यांना दिलासा

अजूनही मागणीच्या तुलनेत बियाण्यांची उपलब्धता कमी आहे. जे आहे ते देखील वाढीव दराने विकले जात असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत होत्या. तसेच, या काळात खतांचीही मागणी जास्त असते, पण वाढीव मागणी व खतांच्या दरातील धोरणांचा गैरफायदा उठवत कृषी सेवा केंद्र चालकांकडून वाढीव दराने खतांची विक्री सुरु असल्याच्याही तक्रारी आल्यानंतर कृषी विभागाने तातडीने पाऊले उचलत त्यांना कारवाईचा दम दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

फोटो: ३००५२०२१-कोल-कृषी ०१, ०२, ०३

फोटो ओळ: कृषी विभागाच्या भरारी पथकांनी रविवारी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्राची अचानक तपासणी करुन साठ्यासह रेकॉर्डची तपासणी केली.