शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे दाखल करून १३ जणांना अटक

By admin | Updated: August 23, 2015 00:35 IST

उत्पादन शुल्क अधिकारी मारहाण : खारेपाटण येथील प्रकाराने खळबळ

कणकवली/खारेपाटण : खारेपाटणनजीक उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांकडून मारहाण झाल्यानंतर मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्या अधिकाऱ्यांना कणकवली पोलीस स्थानकात आणले. त्यावेळी अधिकाऱ्यांवर तक्रार दाखल करण्याच्या मागणीसाठी खारेपाटणवासीय ग्रामस्थही स्थानकात आले. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर कोणतीही तक्रार दाखल न करता प्रकरण सामंजस्याने मिटविण्यात आले. काही वेळातच जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून आलेल्या आदेशानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रार नोंदवली. त्यानुसार गुन्हे दाखल करून खारेपाटण येथील तेरा जणांना अटक करण्यात आली. उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पोलिसांनी खारेपाटण येथे संचलन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १०० दंगल नियंत्रक पथकाच्या पोलिसांनी संचलन केले. रिक्षात दारू नाही लवू रामचंद्र तेली रिक्षा (एम.एच.-०७-सी-४७४२) घेऊन तळेरेहून खारेपाटणच्या दिशेने येत होता. त्याच्यासमवेत किरण भीमाप्पा बेळगे, गणेश दत्तात्रय झगडे, दैवत अंकूश शेट्ये हे होते. उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी दारू वाहतूक करत असल्याच्या संशयावरून अडविलेल्या या रिक्षात दारू आढळली नसल्याचे कणकवलीचे पोलीस निरीक्षक सुनील मोरे यांनी सांगितले. मद्यपान केलेले नाही मारहाण झालेल्या अधिकाऱ्यांनी मद्यपान केलेले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तिघांनाही कणकवली येथे उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांची तपासणी करण्यात आली असता मद्यपान केलेले नसल्याचे स्पष्ट झाले असे पोलीस निरीक्षक सुनील मोरे यांनी सांगितले. तोच ‘दबंग’ अधिकारी उत्पादन शुल्कचे निरीक्षक प्रमोद कांबळे यांनी महिनाभरापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील हातिवले येथे बेकायदा दारू वाहतुकीविरोधात कारवाई करताना गोळीबार केला होता. संबंधित प्रकरणाचा राग मनात ठेवत ही मारहाण झाली असावी, असे बोलले जात आहे. रिक्षाची काच फोडली पाठलाग करताना रिक्षा अडविण्याचा प्रयत्न उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी केला. या प्रयत्नात रिक्षावर दांडा मारल्याने मागील काच फुटली. अधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळपासूनच पोलीस पथके व्हॅनमधून खारेपाटण येथे दाखल होण्यास सुरूवात झाली. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास खारेपाटण बाजारपेठेतून पोलिसांनी संचलन केले. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगत खारेपाटणवासीयांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)