शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Kolhapur: राजाराम कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र, महाडिक गटाला मोठा धक्का

By विश्वास पाटील | Updated: September 7, 2023 16:37 IST

कसबा बावडा : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे १२७२ सभासद प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी सुनावणी घेऊन अपात्र ठरविले. ...

कसबा बावडा : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे १२७२ सभासद प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी सुनावणी घेऊन अपात्र ठरविले. बुधवारी याबाबत सुनावणी झाली. त्यात १३४६ पैकी १२७२ सभासदांना अपात्र ठरवण्यात आहेत.

हा खऱ्या अर्थाने सत्याचा विजय झाला आहे. या अपात्र सभासदांबाबत यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात आमची याचिका दाखल असून, आम्ही आताचा हा लागलेला निकाल पुरवणी म्हणून जोडणार आहे, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या अपात्र झालेल्या सभासदांमध्ये शौमिका महाडिक यांच्यासह महाडिक परिवारातील दहा सदस्यांचा समावेश आहे.राजाराम कारखान्याची निवडणूक २४ एप्रिलला झाली. या निवडणुकीपूर्वी १३४६ अपात्र सभासदांवरून न्यायालयीन लढाई झाली. ज्यांच्या नावावर उसाचे क्षेत्र नाही. जे कारखान्याला कधीच ऊस घालत नाहीत व ते कार्यक्षेत्राबाहेरील आहेत, अशा सभासदांना अपात्र ठरवा म्हणून राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीने न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत १४ फेब्रुवारी २०२०ला प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी सर्व चौकशीअंती १३४६ सभासद अपात्र केले. हा आदेश पुढे १८ फेब्रुवारी २०२१ला तत्कालीन सहकारमंत्री यांनी कायम केला. पुढे हा निर्णय २२ सप्टेंबर २०२२ला उच्च न्यायालयाने कायम केला. मात्र, सर्वाेच्च न्यायालयात या निर्णयाला स्थगिती मिळून सभासदांची फेरसुनावणी घेण्यासाठी साखर सहसंचालक यांना सांगितले.दरम्यानच्या काळात २४ एप्रिल २०२३ला राजाराम कारखान्याची निवडणूक होऊन सत्ताधारी महादेवराव महाडिक गटाने सर्व २१ जागा १४०५ मताधिक्याच्या फरकाने जिंकून कारखान्याची सत्ता ताब्यात ठेवली. मात्र, बुधवारी लागलेल्या निकालात या १३४६ सभासदांबाबत निर्णय होऊन त्यात १२७२ सभासद अपात्र ठरविण्यात आले. या निर्णयाबाबत बोलताना सतेज पाटील म्हणाले, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कारखान्याच्या सत्तारूढ गटाने अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकून आमच्या आघाडीचे ३० उमेदवारांचे अर्ज छाननीतून बेकायदेशीरपणे अवैध ठरवले व आमचे तगडे उमेदवार निवडणूक रिंगणाबाहेर घालवले. तरीसुद्धा सभासदांनी ५ हजार ते ५५०० मते आमच्या आघाडीला दिली. निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या अपात्र सभासदांचे मतदान नसते तर आमचा विजय निश्चितच होता, हे आताच्या निकालावरून सिद्ध झाले आहे. या पत्रकार परिषदेवेळी सर्जेराव माने, मोहन सालपे आदी उपस्थित होते.         प्रमुख अपात्र सभासद...शौमिका महाडिक, ग्रीष्मा महाडिक, ओमवीर महाडिक, ब्रिजगुप्त महाडिक, शंकरराव महाडिक, साधना महाडिक, माई महाडिक, दीपाली महाडिक, मनीषा महाडिक, रेश्मा महाडिक.‘राजाराम’च्या फेरनिवडणुकीची मागणी...प्रादेशिक साखर सहसंचालक यांनी १२७२ सभासद अपात्र ठरवले आहेत. या अपात्र सभासदांमुळेच आम्हाला फटका बसला आहे. त्यामुळे कारखान्याची फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणी कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलAmal Mahadikअमल महाडिक