जिल्हयातील ११८० प्रवाशांनी काल केला एसटी प्रवास, ५६ हजारावर उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:46 PM2020-06-05T17:46:54+5:302020-06-05T17:53:39+5:30

लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यांतर्गत सुरू करण्यात आलेल्या एसटी बसेसच्या माध्यमातून काल दिवसभरात जिल्हयातील ११ आगारातील ३५ बसच्या ८० फेऱ्यातून १ हजार १८० प्रवाशांनी प्रवास केला असून ५६ हजार ११६ रूपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी आज दिली.

1180 passengers from the district made ST journey yesterday, earning over 56 thousand | जिल्हयातील ११८० प्रवाशांनी काल केला एसटी प्रवास, ५६ हजारावर उत्पन्न

जिल्हयातील ११८० प्रवाशांनी काल केला एसटी प्रवास, ५६ हजारावर उत्पन्न

Next
ठळक मुद्देजिल्हयातील ११८० प्रवाशांनी काल केला एसटी प्रवास३५ बसच्या ८० फेऱ्यातून ५६ हजारावर उत्पन्न : विभाग नियंत्रक रोहन पलंगे

कोल्हापूर :लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यांतर्गत सुरू करण्यात आलेल्या एसटी बसेसच्या माध्यमातून काल दिवसभरात जिल्हयातील ११ आगारातील ३५ बसच्या ८० फेऱ्यातून १ हजार १८० प्रवाशांनी प्रवास केला असून ५६ हजार ११६ रूपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी आज दिली.

कोल्हापूर आगाराच्या कोल्हापूर-जयसिंगपूर मार्गावर २ बसेसच्या ४ फेऱ्यातून ८७ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये २ हजार ५७० रूपयांचे उत्पन्न मिळाले. कोल्हापूर-इचलकरंजी मार्गावर एका बसच्या ८ फेऱ्यातून १०७ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ५ हजार ३० रूपयांचे उत्पन्न मिळाले. कोल्हापूर-गडहिंग्लज मार्गावर एका बसच्या २ फेऱ्यातून २४ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ६ हजार २९१ रूपयांचे उत्पन्न मिळाले.

संभाजीनगर आगाराच्या रंकाळा-हुपरी मार्गावर ३ बसेसच्या १२ फेऱ्यातून १८३ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ३ हजार ६९५  रूपयांचे उत्पन्न मिळाले. इचलकरंजी आगाराच्या इचलकरंजी-कोल्हापूर मार्गावर ४ बसेसच्या १८ फेऱ्यातून ३०२ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये १० हजार ५२० रूपयांचे उत्पन्न मिळाले. 

गडहिंग्लज आगाराच्या गडहिंग्लज-कोल्हापूर मार्गावर ४ बसेसच्या ८ फेऱ्यातून १४२ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये १५ हजार ७७५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. गारगोटी आगाराच्या गारगोटी-कोल्हापूर मार्गावर २ बसेसच्या ४ फेऱ्यातून ६५ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ४ हजार ११० रूपयांचे उत्पन्न मिळाले. 

गारगोटी-मुरगूड-कोल्हापूर मार्गावर एका बसेसच्या एका फेरीतून १३ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ४९५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. कोल्हापूर-मुरगूड मार्गावर एका फेरीतून फेऱ्यातून १३ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ६५० रूपयांचे उत्पन्न मिळाले. चंदगड आगाराच्या चंदगड-गडहिंग्लज मार्गावर एका बसच्या ४  फेऱ्यातून २८ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये २९५ रूपयांचे उत्पन्न मिळाले.

कुरूंदवाड आगाराच्या कुरूंदवाड-जयसिंगपूर मार्गावर एका बसच्या ४ फेऱ्यातून २१ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये २६० रूपयांचे उत्पन्न मिळाले. कुरूंदवाड-कोल्हापूर मार्गावर एका बसच्या ४ फेऱ्यातून ७७ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ३ हजार ४२५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. 


कागल आगाराच्या कागल-रंकाळा मार्गावर २ बसेसच्या ४ फेऱ्यातून ३८ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ८८५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. राधानगरी आगाराच्या कोल्हापूर-राधानगरी मार्गावर एका बसच्या २ फेऱ्यातून ३६ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये १ हजार ६२५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. आजरा आगाराच्या आजरा सोहाळे सुतगिरण मार्गावर एका बसच्या ४ फेऱ्यातून ५१ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ४९० रूपयांचे उत्पन्न मिळाले असल्याचेही पलंगे म्हणाले.

 

Web Title: 1180 passengers from the district made ST journey yesterday, earning over 56 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.