शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन दहा स्कूल बसेस सुरू करणार

By admin | Updated: March 8, 2015 00:26 IST

अंदाजपत्रक सादर : ७९ कोटी ७८ लाखांची तरतूद; महिला व पर्यटकांसाठी खास बस

कोल्हापूर : महानगरपालिका केएमटी उपक्रमाच्या सन २०१५ -१६ च्या रुपये ७९ कोटी ७८ लाखांच्या अंदाजपत्रकास शनिवारी परिवहन समिती सभेत मंजुरी देण्यात आली. नवीन वर्षात शहरात १० स्कूल बसेस, गर्दीच्या वेळी महिलांसाठी विशेष बसेस उपलब्ध करून देण्याचा संकल्प केएमटी प्रशासनाने केला आहे. त्याचबरोबर ‘कोल्हापूर दर्शन’ बस सुरू करण्याचाही नव्याने संकल्प करण्यात आला आहे. विशेष म्हणजे केएमटी तोट्यात असतानाही भाडेवाढ करण्यात आलेली नाही. महानगरपालिका परिवहन समितीची विशेष सभा शनिवारी सायंकाळी सभापती अजित पोवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत आयुक्त पी. शिवशंकर यांनी ‘केएमटी’चे नवीन वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. ७९ कोटी ७८ लाख जमा आणि तेवढ्याच खर्चाचा तसेच भांडवली ३२ कोटी १ लाख ५० हजार जमेचा आणि तेवढ्याच खर्चाचा आराखडा आयुक्तांनी परिवहन समितीच्या मान्यतेसाठी सादर केला. त्याला सभेत मंजुरी देण्यात आली. नवीन आर्थिक वर्षात १०४ नवीन बसेस ताफ्यात दाखल करून घेऊन त्या मार्गस्थ करणे, त्यांपैकी १० बसेस विद्यार्थी वाहतुकीसाठी उपलब्ध करून देणे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी गर्दीच्या वेळी महिलांसाठी विशेष बससेवा उपलब्ध करून देणे, युटिलिटी व्हेईकल खरेदी करणे, शाळा-महाविद्यालयांत जाऊन पास वितरण व्यवस्था राबविणे असे संकल्प करण्यात आले आहेत. नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतून मुख्य यंत्रशाळा परिसर विकसित करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. शासनाच्या विशेष अनुदानातून नवीन बसेसवर व यंत्रशाळा परिसरात सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती व वापराचे नियोजन करण्यात आले आहे. यंत्रशाळेच्या आवारात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रक ल्प राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)