१) गडहिंग्लज येथे कोरोनाविषयी प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST2021-03-09T04:26:14+5:302021-03-09T04:26:14+5:30

१) गडहिंग्लज येथे कोरोनाविषयी प्रबोधन गडहिंग्लज : महिला दिनानिमित्त येथील राधाकृष्ण पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कोरोनाविषयी जनजागृती करण्यात ...

1) Awareness about Corona at Gadhinglaj | १) गडहिंग्लज येथे कोरोनाविषयी प्रबोधन

१) गडहिंग्लज येथे कोरोनाविषयी प्रबोधन

१) गडहिंग्लज येथे कोरोनाविषयी प्रबोधन

गडहिंग्लज : महिला दिनानिमित्त येथील राधाकृष्ण पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कोरोनाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी डॉ. बेनिता डायस, प्राचार्या वैशाली भिऊंगडे, प्रा. जी. बी. कांबळे यांनी मार्गदर्शन केले. संजीवनी हणबर यांनी प्रास्ताविक केले. स्वाती लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. मेघा वाघराळकर यांनी आभार मानले.

२) महादेव बिद्रे यांची निवड

गडहिंग्लज : इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील ज्येष्ठ वारकरी महादेव श्रीशैलाप्पा बिद्रे यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली. विठ्ठल चुदाई यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. यावेळी नाना कांबळे, ईश्वर कांबळे, महादेव कांबळे, वसंत शेटके, आनंदा मगदूम, लक्ष्मण सुतार, शिवाजी कांबळे, लक्ष्मण कांबळे उपस्थित होते.

३) नूलमध्ये पाककला स्पर्धांना प्रतिसाद

नूल : नूल (ता. गडहिंग्लज) येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धा झाल्या. प्राचार्य जयवंत वडर यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले.

स्पर्धेत मधुरा थोरात, सृष्टी इंगळे, मेघा नांगरे, श्रद्धा चव्हाण, स्फूर्ती चितारी, वैष्णवी माने, पौर्णिमा शिंदे, रोहिणी मांग, शिवानी जाधव, अंकिता चव्हाण यांनी यश मिळविले.

यावेळी शीतल कल्याणी, विजया सूर्यवंशी, उज्ज्वला जामुनी, अफसाना गवंडी यांचा सत्कार झाला. अश्विनी मरुकटे यांनी स्वागत केले.

Web Title: 1) Awareness about Corona at Gadhinglaj