कल्याणमध्ये पुस्तकांची गुढी उभारुन साजरा झाला जागतिक पुस्तक दिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 22:03 IST2026-04-24T22:02:01+5:302026-04-24T22:03:10+5:30

कल्याण सार्वजनिक वाचनालयाने जागतिक पुस्तक दिनानिमित्त प्रबोधनकार ठाकरे सरोवर परिसरात पुस्तक प्रदर्शन, तात्काळ सभासद योजना आणि कविता वाचन कार्यक्रम गुरुवारी पार पडला.

World Book Day celebrated by erecting a book tower in Kalyan | कल्याणमध्ये पुस्तकांची गुढी उभारुन साजरा झाला जागतिक पुस्तक दिन

कल्याणमध्ये पुस्तकांची गुढी उभारुन साजरा झाला जागतिक पुस्तक दिन

कल्याण : कल्याण सार्वजनिक वाचनालयाने जागतिक पुस्तक दिनानिमित्त प्रबोधनकार ठाकरे सरोवर परिसरात पुस्तक प्रदर्शन, तात्काळ सभासद योजना आणि कविता वाचन कार्यक्रम गुरुवारी पार पडला. त्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

कल्याण डोंबिवली महापालिका उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या हस्ते पुस्तक गुढीचे पूजन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्याच्या उदेशाने सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तत्काळ सभासद योजनेत जास्तीत जास्त वाचकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी केले. वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांनी डिजिटल युगात ई – बुक्स व ऑडीओबुक्स उपलब्ध असले तरी हातात पुस्तक घेऊन वाचण्याचा आनंद वेगळाचा असतो असे मत व्यक्त केले.

सकाळीच तलाव परिसरात फेरफटका मारणारे नागरीकांना एका ठिकाणी ग्रंथ पाहण्याची संधी मिळाली. वाचनालयाच्यावतीने सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जातात. या पुस्तक प्रदर्शनामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळेल असे मत वाचनालयाच्या वाचक सभासदांनी मांडले. “एक कविता तळ्याकाठी” या उपक्रमांतर्गत तळ्याकाठच्या शांततेचा व निसर्गाच्या सौदर्याचा अनुभव घेत कवी मकरंद वांगणेकर ,सुधाकर कांबळी,सिने नाट्य अभिनेता सुधाकर वसईकर,रंगकर्मी सुधीर चित्ते, स्वाती नातू, जया पाटील, संयुक्ता राठोड, मंगला कांकणे, सुरेखा गावंडेअशा अनेक रसिक मान्यवर कवींनी कविता सादर केल्या.

तत्काळ सभासद योजनेचा लाभ साहित्यप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर घेतला. प्रसंगी वाचनालयाचे अॅड. सुरेश पटवर्धन,वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी, विजयसिंह परदेशी, बाळकृष्ण धुरी,प्रगती महाविद्यालयाच्या प्रा. मालती पाटील, महाविद्यालयीन विद्यार्थी,वाचक,साहित्यप्रेमी, ग्रंथसेविका आदी उपस्थित होतेे.

Web Title : कल्याण में पुस्तकों की 'गुढी' के साथ विश्व पुस्तक दिवस मनाया गया

Web Summary : कल्याण सार्वजनिक वाचनालय ने प्रबोधनकार ठाकरे सरोवर के पास पुस्तक प्रदर्शनी, तत्काल सदस्यता अभियान और कविता पाठ के साथ विश्व पुस्तक दिवस मनाया। कल्याण डोंबिवली महानगर पालिका द्वारा उद्घाटन, वाचन संस्कृति को बढ़ावा दिया गया। पाठकों को किताबें ब्राउज़ करने और कवियों को प्रकृति के बीच अपनी रचनाएँ साझा करने का अवसर मिला।

Web Title : Kalyan Celebrates World Book Day with Book 'Gudhi'.

Web Summary : Kalyan Public Library marked World Book Day with a book exhibition, immediate membership drive, and poetry reading near Prabodhan Thackeray Lake. The event, inaugurated by Kalyan Dombivli Municipal Corporation, promoted reading culture. Readers enjoyed the chance to browse books and poets shared their work amidst nature.

टॅग्स :kalyanकल्याण