अखेर उल्हासनगर महापालिकेची रेजेन्सीच्या २७ अवैध गाळ्यावर पाडकाम कारवाई 

By सदानंद नाईक | Updated: May 7, 2026 20:20 IST2026-05-07T20:19:19+5:302026-05-07T20:20:07+5:30

स्कायडोमच्या वाणिज्य बांधकामा कारवाई कधी?

ulhasnagar municipal corporation finally takes demolition action against 27 illegal slums in Regency | अखेर उल्हासनगर महापालिकेची रेजेन्सीच्या २७ अवैध गाळ्यावर पाडकाम कारवाई 

अखेर उल्हासनगर महापालिकेची रेजेन्सीच्या २७ अवैध गाळ्यावर पाडकाम कारवाई 

सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-३, येथील रेजन्सी प्लाझा बी विंगच्या तब्बल २७ अनाधिकृत गाळे महापालिका अतिक्रमण विभागाने, गुरुवारी दुपारी निष्कासित केले. मात्र त्या शेजारील 'स्काय डोम हॉल'चे तब्बल साडेतीन हजार चौरस मीटरचे अवैध बांधकामावर कारवाई कधी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-३, शांतीनगर येथील रेजन्सी प्लाझा बी विंगवर संपूर्ण ऐक मजला अवैध बांधकाम झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. महापालिकेच्या नगररचना विभागाने 'कारणे दाखवा' नोटिसा बजावूनही कारवाई झाली नोव्हती. दरम्यान महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे गुरुवारी दुपारी तब्बल २७ गाळ्यावर सहाय्यक आयुक्त अजय साबळे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांच्या उपस्थित पथकाने कारवाई केली. या कारवाईने अवैध बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहे. ही बांधकामे पूर्णतः जमीनदोस्त झाली नाहीतर, कालांतराने पुन्हा ती उभी राहण्याची भीती व्यक्त होत आहे. शिंपी यांनी अवैध बांधकामावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.

 रेजन्सी प्लाझा बी विंगच्या शेजारील स्काय डोम हॉलमध्येही विनापरवाना साडेतीन हजार चौरस मीटरचे वाढीव बांधकाम झाल्याची तक्रार नगररचना विभागाकडे प्राप्त झाली होती. पालिकेच्या नोटीसीनंतर बांधकामावर अर्धवट पाडकाम कारवाई झाली. काही कारणास्तव पाडकाम कारवाई थांबली. त्यानंतर नगररचनाकार विभागाने पुन्हा बांधकामाला नोटीस दिली. त्यावर पाडकाम कारवाई कधी? असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच कॅम्प नं-२ मधील स्पेक्ट्रम रेसिडेन्सी ही इमारत थेट रस्त्याच्या जागेत बाधित होत असल्याचे उघड झाले. महापालिकेने या इमारतीला नोटीस दिली असली, तरी तिथे फ्लॅटची विक्री जोमाने सुरू आहे. भविष्यात खरेदीदारांची फसवणूक झाल्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title : उल्हासनगर महानगरपालिका ने रेजेंसी की 27 अवैध दुकानों को तोड़ा।

Web Summary : उल्हासनगर महानगरपालिका ने रेजेंसी प्लाजा में 27 अनधिकृत दुकानों को तोड़ा। 'स्काई डोम हॉल' के अवैध निर्माण पर कार्रवाई पर सवाल। स्पेक्ट्रम रेसिडेंसी द्वारा सड़क अवरुद्ध करने पर चिंता, नोटिस के बावजूद फ्लैटों की बिक्री जारी।

Web Title : Ulhasnagar Municipal Corporation demolishes 27 illegal Regency shops after complaints.

Web Summary : Ulhasnagar Municipal Corporation demolished 27 unauthorized shops in Regency Plaza. Questions arise regarding action on the adjacent 'Sky Dome Hall's' illegal construction. Concerns raised about Spectrum Residency blocking road space, with ongoing flat sales despite notices.