शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

टोलमुक्ती! कल्याण-शिळ मार्गावरील काटई येथील टोलवसुली अवजड वाहनांसाठीसुद्धा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 15:08 IST

Toll collection at Katai on Kalyan-Shil road : कल्याण-शीळ रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम सुरु असून काटई येथील टोल वसुली बंद झाल्यामुळे वाहतूक कोंडी पासून होणार प्रवाशांची मुक्तता होणार आहे.

ठळक मुद्देराज्यातील जुना टोल अशी कल्याण-शिळ रोडवर असलेल्या या काटई टोलची ओळख आहेवाहतूक कोंडीमुळे काटई टोल नाका बंद करण्याचा राज्य सरकारचा मोठा निर्णयसद्यस्थितीत कल्याण – शिळ रस्त्याचे रुंदीकरणाचे काम उत्तम गतीने सुरू आहे. या रस्त्यावरून प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे

डोंबिवली - कल्याण शिळ रस्त्यावर काटई येथे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचा टोल नाका असून तो इगल इन्फ्रास्ट्रक्चर या खाजगी कंपनीद्वारे चालविण्यात येत होता. यापूर्वी हलक्या वाहनांसाठी टोल वसुली बंद करण्यात आली होती, तद्नंतर सदर टोलनाक्यावर केवळ अवजड वाहनांना टोल आकारला जात होता. परंतु; खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे सदर टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी मागणी वारंवार करीत होते, त्यास अखेर यश मिळाले आहे.    

सद्यस्थितीत कल्याण – शिळ रस्त्याचे रुंदीकरणाचे काम उत्तम गतीने सुरू आहे. या रस्त्यावरून प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नवी मुंबई, मुंबई, पनवेल, ठाणे व महामार्गावर जाण्यासाठी हा महत्वाचा मार्ग असून मध्येच टोलनाक्यावरहि अवजड वाहनांना थांबा मिळत असल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास येते.    निळजे येथील धोकादायक असलेला उड्डाणपूलाची डागडुजी करून तोही अवजड वाहनांना करता खुला करण्यात आला आहे. काटाई येथील टोल बंद करून तेथील टोल बूथ सुद्धा तेथून काढून टाकण्यात यावी जेणेकरून वाहतुकीस अडथला होणार नाही  हि बाब  खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निदर्शनास आणून दिले असता , राज्य शासनाने सदर कल्याण-शिळ रस्त्यावरील काटई टोल नाकाबंद करण्याचा निर्णय घेतला आहे.      कोनगांव ते शिळ रोड दरम्यान रस्त्याचे काम हि होणार असून काटई टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीपासूनही मुक्तता होणार असल्याने नागरिकांना व प्रवाशांना जलदगतीने प्रवास करणे शक्य होईल आणि नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे होणारा त्रास हि संपेल अशी माहिती खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली, तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व राज्य सरकारचेहि यावेळेस आभार व्यक्त केले आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाdombivaliडोंबिवलीthaneठाणे