कल्याणामध्ये वाईन शॉपवर चोरट्यांनी मारला डल्ला, ४ लाख ७५ हजारांची रोकड लंपास

By मुरलीधर भवार | Updated: August 3, 2024 14:58 IST2024-08-03T14:57:58+5:302024-08-03T14:58:19+5:30

चोरट्यांनी हा एक्झॉस फॅन काढून त्या ठिकाणाहून दुकानात प्रवेश केला. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

Thieves hit a wine shop in Kalyan, looted cash worth 4 lakh 75 thousand | कल्याणामध्ये वाईन शॉपवर चोरट्यांनी मारला डल्ला, ४ लाख ७५ हजारांची रोकड लंपास

कल्याणामध्ये वाईन शॉपवर चोरट्यांनी मारला डल्ला, ४ लाख ७५ हजारांची रोकड लंपास

कल्याण - गटारी आमवस्येची वेध तळीरामांना लागले आहेत. आठवड्याभरापासून गटारीचा माहोल आहे. उद्या गटारी आमवस्या आहे. त्याच्या आदल्या रात्रीच चोरट्यांनी कल्याण स्टेशन परिसरातील वाईन शॉपवर डल्ला मारला आहेर. वाईन शॉप दुकानातील चार लाख ७५ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. रोकड चोरी केली असली तरी दुकानातील दारुच्या बाटल्या चोरी केलेल्या नाहीत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्हीच्या सहाय्याने चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. लवकर चोरटे पोलिसांच्या जाळ्यात सापडलीत असे पोलिसांनी सांगितले.

स्टेशन परिसरात असलेल्या वाईन शॉपच्या मागच्या बाजूस एक्झॉस फॅन आहे. चोरट्यांनी हा एक्झॉस फॅन काढून त्या ठिकाणाहून दुकानात प्रवेश केला. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कल्याण स्टेशन हे जंक्शन आहे. रात्री प्रवासी भाडे भरण्याकरीता रिक्षा उभ्या असतात. खासगी कारही उभ्या असतात.

ज्या दुकानात चोरी झाली त्या दुकानापासून जवळच जुने महात्मा फुले पोलिस ठाणे, सहाय्यक पोलिस आयुक्तांचे कार्यालय आहे. रात्री पोलिसांची गस्त असते. याशिवाय स्टेशन परिसर विकासाचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु आहे. त्या कंत्राट कंपनीचे सुरक्षा रक्षकही असतात. चोरट्यांनी चोरी केली. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चाेरट्यांनी चार लाख ७५ हजार चोरल्याने त्यांची गटारी झाली आहे.

Web Title: Thieves hit a wine shop in Kalyan, looted cash worth 4 lakh 75 thousand