डोंबिवलीत पेट्रोलपंपावर लागली अचानक आग; सुदैवाने जीवितहानी नाही  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 15:35 IST2021-10-16T15:34:10+5:302021-10-16T15:35:28+5:30

पेट्रोलचे सॅम्पल काढून ते बकेट मध्ये ठेवताना अचानक बकेटमधील पेट्रोलला आग लागली.घटना घडल्यावर काही वेळ पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आला होता.

Sudden fire at petrol pump in Dombivali; Fortunately no casualties | डोंबिवलीत पेट्रोलपंपावर लागली अचानक आग; सुदैवाने जीवितहानी नाही  

डोंबिवलीत पेट्रोलपंपावर लागली अचानक आग; सुदैवाने जीवितहानी नाही  

डोंबिवली - डोंबिवलीमध्ये शनिवारी भर दुपारी एका पेट्रोलपंपावर अचानक आग लागल्याची घटना घडली. पश्चिमेकडील राजूनगर पेट्रोल पंप येथे  दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नाही. 
         
पेट्रोलचे सॅम्पल काढून ते बकेट मध्ये ठेवताना अचानक बकेटमधील पेट्रोलला आग लागली.घटना घडल्यावर काही वेळ पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आला होता. डोंबिवली पूर्वेकडील अग्निशामक केंद्राला या घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमक दलाचा बंब घेऊन जवान घटनास्थळी पोहोचले.अग्निशमक केंद्र डोंबिवली पश्चिम उपस्थानक अधिकारी जीवन बोऱ्हाडे यांसह जवानांनी सदर ठिकाणी आग काही क्षणाच विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र आता या घटनेमुळे पेट्रोपपंप वरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Sudden fire at petrol pump in Dombivali; Fortunately no casualties

टॅग्स :fireआग