कल्याण रेल्वे स्थानकात आरपीएफ जवानावर हल्ला; तिघे अटकेत, आधारवाडी कारागृहात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 08:50 IST2026-05-17T08:50:05+5:302026-05-17T08:50:23+5:30

आरपीएफ जवान नरेंद्र यादव यांना दादर-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये काहीजण एका प्रवाशाला मारहाण करत असल्याची माहिती मिळाली.

RPF jawan attacked at Kalyan railway station; Three arrested, sent to Aadharwadi jail | कल्याण रेल्वे स्थानकात आरपीएफ जवानावर हल्ला; तिघे अटकेत, आधारवाडी कारागृहात रवानगी

कल्याण रेल्वे स्थानकात आरपीएफ जवानावर हल्ला; तिघे अटकेत, आधारवाडी कारागृहात रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : ट्रेनमधील प्रवाशांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानावरच तीन प्रवाशांनी मिळून हल्ला केल्याची खळबळजनक घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी (जीआरपी) तत्परता दाखवत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, न्यायालयाने त्यांची आधारवाडी कारागृहात रवानगी केली आहे.

आरपीएफ जवान नरेंद्र यादव यांना दादर-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये काहीजण एका प्रवाशाला मारहाण करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते तातडीने डब्यात पोहोचले. त्यांनी तिघांना चौकशीसाठी फलाटावर उतरण्यास सांगितले. मात्र, फलाट क्रमांक चारवर उतरताच आरोपींनी यादव यांच्यावर हल्ला चढविला. घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी अब्दुल शेख, सलमान शेख आणि सरकार शेख यांना अटक केली. तिघांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली.  याप्रकरणी कल्याण आरपीएफचे प्रभारी अधिकारी पी. आर. मीणा म्हणाले की, प्रवाशांमधील भांडण सोडविताना मारहाणीची घटना घडली.

Web Title : कल्याण स्टेशन पर आरपीएफ जवान पर हमला; तीन गिरफ्तार

Web Summary : कल्याण स्टेशन पर एक आरपीएफ जवान पर तीन यात्रियों ने हमला किया जब वह एक विवाद को सुलझाने की कोशिश कर रहा था। पुलिस ने हमलावरों को गिरफ्तार किया, जिनकी पहचान अब्दुल शेख, सलमान शेख और सरकार शेख के रूप में हुई। उन्हें आधारवाड़ी जेल भेज दिया गया है।

Web Title : RPF Jawan Attacked at Kalyan Station; Three Arrested

Web Summary : Three passengers attacked an RPF jawan at Kalyan station while he was trying to resolve a dispute. Police arrested the attackers, identified as Abdul Sheikh, Salman Sheikh, and Sarkar Sheikh. They have been sent to Adharwadi Jail.

टॅग्स :railwayरेल्वे