शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

पाणीबिलांपोटी ३८ कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 01:07 IST

कल्याण-डोंबिवली मनपा : ९० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने पाणीबिलांपोटी ९० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य ठेवले असले तरी प्रत्यक्षात आतापर्यंत ३८ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. त्यामुळे ९० कोटींचे लक्ष्य साध्य होणे अशक्य असल्याचे सांगण्यात येत आहे.केडीएमसी अधिकृत नळजोडण्याधारकांना वर्षातून चार वेळा पाणीबिले पाठवते. मात्र, ही बिले भरण्याकडे नागरिकांचा कल कमी आहे. एक दिवस पाणी आले नाही तर नागरिकांची महापालिकेविरोधात ओरड सुरू होते. पाणीबिलांचा भरणा मात्र वेळेवर केला जात नाही. पाणीबिलाच्या वसुलीपोटी वर्षाला ९० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आतापर्यंत कधीच दिलेले लक्ष्य गाठलेले नाही.

सन २०१८ मध्ये महापालिकेने ६५ कोटी रुपये पाणीबिलांची वसुली केली होती. यंदा मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे त्याचा पाणीबिलाच्या वसुलीवर परिणाम झाल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे. महापालिकेच्या हद्दीत पाण्याच्या अधिकृत जोडण्यांपेक्षा बेकायदा जोडण्यांचे प्रमाण जास्त आहे. अधिकृत नळजोडणीधारकही वेळेवर पाणी बिले भरत नाहीत.महापालिकेची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना असली तरी महापालिकेचा देखभाल-दुरुस्तीवर होणारा खर्चही पाणीबिलाच्या वसुलीतून निघत नाही. २७ गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या गावांतूनही बिलांची वसुली होत नाही. तरीही एमआयडीसीकडे महापालिका पाणीबिलाचे पैसे भरते. पाणीबिलापोटी २७ गावांतून २३ कोटी रुपयांची वसुली होणे बाकी आहे. आता २७ पैकी १८ गावे वगळण्याचा वाद न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे वसुलीवरही त्याचा परिणाम होत आहे.

पाणीगळतीचे प्रमाण २१ टक्के nकेडीएमसी हद्दीत पाणीगळतीचे प्रमाण २१ टक्के आहे. जागतिक पाणीगळतीच्या निकषांनुसार १५ टक्के पाणीगळती ग्राह्य धरली जाते. nमात्र महापालिकेच्या हद्दीतील पाणीगळती ही या निकषांपेक्षा सहा टक्क्यांनी जास्त आहे.nपाणीगळती व चोरीमुळे काही भागांना कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिक सांगतात.  ही गळती थांबवावी अशी मागणी हाेत आहे.

केवळ ६०० बेकायदा नळजोडण्यांचा शोध nबेकायदा नळजोडण्यांविरोधात महापालिका धडक मोहीम आखत नाही. बेकायदा नळजोडण्या शोधण्यासाठी महापालिकेने नेमलेल्या कंत्राटदाराकडून योग्य प्रकारे काम झालेले नाही. nकेवळ ६०० बेकायदा नळजोडण्या शोधण्यात आल्या. त्या नियमित करण्याची प्रक्रियाही केलेली नाही.nपाणीचोरांविरोधात कोणतीही ठोस कारवाई होत नाही. बेकायदा नळजोडण्यांबाबत शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी वारंवार मुद्दा उचलून धरला आहे. मात्र प्रशासनाकडून केवळ वरवरची कारवाई केली जाते. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका