शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

मतदार ओळखपत्रांप्रकरणी पाच बीएलओंना नोटीस; मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 06:15 IST

कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या नेतीवली येथील शाळेत ही मतदार ओळखपत्रे रद्दी म्हणून ठेवली होती.

लाेकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : पिसवली येथे सापडलेली मतदार ओळखपत्रे ही जुनी आहेत. त्याचा मतदानासाठी वापर होणे याची एक टक्काही शक्यता नाही. या प्रकरणी पाच बीएलओंना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत, अशी माहिती कल्याण मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांनी दिली आहे. 

गुजर यांनी सांगितले की, ७२० जुनी मतदार ओळखपत्रे सापडली आहेत. त्यापैकी ६७९ मतदार ओळखपत्रे ही २००६ ते २०१४ दरम्यानची आहेत. ४१ स्मार्ट कार्ड  ही २०१७ ते २०२१ कालावधीतील आहे. ही बाब कल्याण डोंबिवली महापालिका शिक्षणाधिकारी आणि ठाणे महापालिकेचे  दिवा विभागाचे सहायक आयुक्त यांच्या लक्षात आणून दिली आहे. 

कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या नेतीवली येथील शाळेत ही मतदार ओळखपत्रे रद्दी म्हणून ठेवली होती. रद्दी एका गोणीत भरून एका टेम्पोतून दुसरीकडे नेली जात होती. त्यापैकी एक गोणी पिसवलीजवळ पडली. त्या गोणीत ही ओळखपत्रे होती. त्या गोणीत काही विद्यार्थ्यांचे शालेय निकालही होते. त्यामुळे ही ओळखपत्रे कुठून कोठे नेली जात होती, याचा पत्ता लागला आहे.

‘कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द करा’मतदार ओळखपत्रे सापडल्याने शुक्रवारी उद्धवसेनेने मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. ही मतदार ओळखपत्रे खरी आहे की बनावट? याचा शोध घ्यावा, या ओळखपत्रांच्या आधारेच शिंदेसेनेचा उमेदवार कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्याचा संशय व्यक्त करीत निवडणूक आयोगाने या मतदारसंघातील निवडणूक रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन कल्याण लोकसभा मतदारसंघातील उद्धवसेनेच्या पराभूत उमेदवार वैशाली दरेकर यांनी मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राम चोपडे यांना दिले. या प्रसंगी जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, धनंजय बोडारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

‘ती’ ओळखपत्रे खरी

- मतदार ओळखपत्रे सापडल्याची माहिती मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांनी कल्याण तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांना दिली. - तहसीलदारांनी तपासणी केली असता ही ओळखपत्रे खरी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

टॅग्स :kalyan-pcकल्याणmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४