अनैतिक संबंधातून विवाहीतेची हत्या; काही तासातच पोलीसांनी उकलले गुढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 22:58 IST2021-02-22T22:57:53+5:302021-02-22T22:58:03+5:30

हळदी समारंभ सुरू असताना एका महिलेवर प्राणघातक हल्ला करून हल्लेखोराने तीची हत्या केल्याची घटना रविवारी रात्री 12.30 वाजता घडली होती.

Murder of a married woman through an immoral relationship Within a few hours, the police solved the mystery | अनैतिक संबंधातून विवाहीतेची हत्या; काही तासातच पोलीसांनी उकलले गुढ

अनैतिक संबंधातून विवाहीतेची हत्या; काही तासातच पोलीसांनी उकलले गुढ

कल्याण: हळदी समारंभ सुरू असताना एका महिलेवर प्राणघातक हल्ला करून हल्लेखोराने तीची हत्या केल्याची घटना रविवारी रात्री 12.30 वाजता घडली होती. या घटनेत भारती जगदीश म्हात्रे आणि पवन जगदीश म्हात्रे हे मायलेकही जखमी झाले होते. ही हत्या लुटमारीच्या हेतूने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. परंतू खडकपाडा पोलीसांनी कसोशीने केलेल्या तपासात काही तासातच या हत्येचे गुढ उकलण्यात त्यांना यश आले आहे.

पवन म्हात्रे यानेच अनैतिक संबंधातून त्या महिलेची बंदुकीतून गोळया घालून हत्या केल्याचे तपासात समोर आल्याची माहीती कल्याण परिमंडळ पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. पवनने त्याच्या आईवरही लोखंडी रॉडने हल्ला केल्याने ती जखमी झाली आहे. पवनने सुरूवातीला खोटी माहीती देऊन वस्तुस्थिती लपविण्याचा प्रयत्न केला होता. परंतू तपासात त्यानेच ही हत्या केल्याचे उघड झाल्याचे पानसरे यांनी सांगितले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Murder of a married woman through an immoral relationship Within a few hours, the police solved the mystery